Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत

Ind vs Aus WTC Final : पराभवानंतर कारणं शोधण्याची सवय कधी सुटणार? साध्या-सोप्या गोष्टी कोणी लक्षात घेत नाहीय. टीम इंडियाचा एक प्लेयर काही महिने इंग्लंडमध्येच होता. पण काय फायदा झाला?

Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत
ind vs aus wtc final 2023 Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:40 PM

लंडन : टीम इंडियाचा एखाद्या मोठ्या स्पर्धेत किंवा महत्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर लगेच कारणांचा शोध घ्यायला सुरुवात होते. खोलात जाऊन विचार करण्यापेक्षा डोळ्यासमोर जे कारण असतं, ते पहिलं सांगितलं जातं. काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया WTC फायनलमध्ये हरली. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. WTC फायनलच्या काही महिने आधी मायदेशात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवलं होतं.

त्याआधी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलेलं. त्यांच्या घरात जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच पारड जड मानलं जातं होतं.

काय केलं, तर फक्त टॉस जिंकला

हे सुद्धा वाचा

प्रत्यक्षात फायनल सामना सुरु झाल्यानंतर टॉस आणि पहिल्या दिवसाच पहिलं सत्र वगळता टीम इंडिया संपूर्ण मॅचमध्ये बॅकफूटवर होती. टीम इंडियाला एकही दिवस कसोटीवर वर्चस्व निर्माण करता आलं नाही. परिणामी टीम इंडियाचा 209 धावांनी दारुण पराभव झाला. आता या पराभवाच विश्लेषण करताना वेगवेगळी कारण शोधली जात आहेत.

फक्त IPL कशी जबाबदार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवासाठी IPL 2023 ला जबाबदार धरलं जातय. आयपीएलमुळे टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पराभव झाला, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांच मत आहे. WTC मधील पराभवाला फक्त एकमेव IPL टुर्नामेंट कशी जबाबदार असू शकते?. टीम इंडियाचे खेळाडू फक्त दोन महिने आयपीएलमध्ये खेळतात. त्याआधी वर्षभर त्यांच वनडे, T20 आणि टेस्ट क्रिकेट सुरुच असतं.

वर्षभरात फक्त IPL मध्येच खेळलेत का?

टीम इंडियाचे खेळाडू वर्षभरात फक्त IPL खेळून, डायरेक्ट WTC ची फायनल खेळत नाहीयत ना? त्याआधी ते बरच T20, वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळलेत. महत्वाच म्हणजे या टीममध्ये कोणी नवखे खेळाडू नाहीयत. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दीर्घ अनुभव मग आयपीएल कसं जबाबदार?

फिटनेसचा मुद्दा अयोग्य

फिटनेसचा विषय असेल, तर सगळे खेळाडू फिट होते, म्हणून त्यांची निवड केली होती. जसप्रीत बुमराह, केएल राहुल अनफिट असल्यामुळे त्यांची निवड झाली नव्हती. त्यामुळे फायनल हरण्याला फिटनेसचा मुद्दा सुद्धा लागू पडत नाही.

जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला

चेतेश्वर पुजारा तर आधीपासून इंग्लंडमध्ये होता. WTC फायनलच्या काही महिने आधीपासून चेतेश्वर पुजारा तिथे काऊंटी क्रिकेट खेळतोय. महत्वाच म्हणजे त्याने तिथे अनेक शतकं सुद्धा झळकवली आहेत. चेतेश्वर पुजाराच्या त्याच फॉर्मचे दाखले दिले जात होते. पण इंग्लंडमध्ये इतके महिने राहून चेतेश्वर पुजाराने काय केलं? जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला. मग पराभवाला फक्त आयपीएल कसं जबाबदार

WTC फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 आणि दुसऱ्या डावात 27 रन्सवर बाद झाला. तो, तर आयपीएल खेळत नव्हता. इंग्लंडमध्ये इतके महिने राहून, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतरही तो फ्लॉप होतो. मग पराभवाला आयपीएल कसं जबाबदार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.