CSK Ravindra Jadeja : पडद्यामागे जे घडलं ते समोर आलं, CSK ने अशी दूर केली जाडेजाची नाराजी

CSK Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाला CSK सोबत ठेवण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. रवींद्र जाडेजाने मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. धोनीची कुठली गोष्टी आवडली नाही, ते सुद्धा जाडेजाने सांगितलं.

CSK Ravindra Jadeja : पडद्यामागे जे घडलं ते समोर आलं, CSK ने अशी दूर केली जाडेजाची नाराजी
ms dhoni-ravindra jadejaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 8:39 AM

CSK Ravindra Jadeja : आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा यांच्यातील संबंध बिघडले होते. दोघांमधील मतभेदांची सोशल मीडियावर चर्चा होती. रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित सर्व फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले होते. आता आयपीएलचा 16 वा सीजन सुरु होण्यासाठी चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा सीएसकेच्या कॅम्पमध्ये दिसतोय. धोनी सोबत जाडेजाचा सराव सुरु आहे.

माही पुन्हा एकदा चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तयारी करतोय. मागच्या सीजनमधील चेन्नई टीमच वातावरण पाहता, रवींद्र जाडेजा चेन्नईची साथ सोडणार, असं छातीठोकपणे सांगितलं जात होतं.

तिथूनच सर्व गोष्टी बिघडल्या

रवींद्र जाडेजाला मागचा सीजन सुरु होण्याआधी चेन्नई टीमच कॅप्टन बनवण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई टीमची कामगिरी चांगली होत नव्हती. सीजन सुरु असतानाच जाडेजाला कॅप्टनशिपवरुन हटवून त्याच्याजागी पुन्हा एकदा एमएस धोनीच्या हाती नेतृत्व देण्यात आलं. तिथूनच सर्व गोष्टी बिघडण्यास सुरुवात झाली. परिस्थिती अशी झाली की, सीजनच्या अखेरीस जाडेजा टीमची साथ सोडून निघून गेला.

त्यावेळी जाडेजाने मनातलं सगळं सांगितलं

क्रिकबजच्या वृत्तानुसार, रवींद्र जाडेजा आता सीएसकेच्या कॅम्पमध्ये परतलाय, त्यामागे कारण आहे महेंद्र सिंह धोनी. जाडेजाची नाराजी दूर करण्यासाठी धोनीने त्याच्यासोबत दीर्घ चर्चा केली. त्यावेळी जाडेजाने आपल्या मनातील सर्व गोष्ट धोनीसमोर उघड केल्या. त्यावेळी धोनीने त्याला समजावलं व पुन्हा सीएसकेकडून खेळण्यासाठी तयार केलं. त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि CEO काशी विश्वनाथ यांनी आमने-सामने बसून चर्चा केली. सर्व गैरसमज दूर झाले. या चर्चेनंतर जाडेजा आणि टीम दोघे समाधानी आहेत, असं विश्वनाथ यांनी सांगितलं. धोनीच कुठलं स्टेटमेंट जाडेजाला आवडलं नाही?

जाडेजा, कॅप्टनशिप आणि त्याच्या फॉर्म संदर्भात दिलेल्या कमेंटवर नाराज होता. धोनीने त्याच्या कॅप्टनशिपबद्दल केलेलं एक स्टेटमेंट जाडेजाला आवडलं नव्हतं. जाडेजावर कॅप्टनशिपचा दबाव आहे. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर दिसतोय, असं एमएस धोनी म्हणाला होता. जेव्हा स्वत: धोनीने त्याच्या या कमेंटबद्दल समजावलं, तेव्हा जाडेजाला गोष्टी लक्षात आल्या. त्याची नाराजी दूर झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.