भयानक क्रूरता, दोघे एकाच मुलीच्या प्रेमात, अखेर इंजिनिअरकडून मित्राचा शिरच्छेद, पोट फाडलं आणि….

Hyderabad Crime News : त्याच्या मनात इतकी क्रूरता भरली होती की, त्याने मृतदेहाच गुप्तांग सुद्धा कापलं. मित्र गर्लफ्रेंडला त्रास देतो, या रागातून आरोपीने हे कृत्य केलं. मृत युवक 22 वर्षांचा होता. नालगोंडा येथे त्याचं इंजिनिअरींगच शिक्षण सुरु होतं.

भयानक क्रूरता, दोघे एकाच मुलीच्या प्रेमात, अखेर इंजिनिअरकडून मित्राचा शिरच्छेद, पोट फाडलं आणि....
naveen-krishna
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 4:34 PM

Hyderabad Crime News : सर्वसामान्यांना हादरवून सोडणारं अत्यंत भयानक हत्याकांड हैदराबादमध्ये घडलं आहे. आरोपीने गुन्हा करताना क्रौर्याचा कळस गाठला. हैदराबाद शहरातील पेड्डा अंबरपेठ भागात काळजाचा थरकार उडवणारा हा गुन्हा घडला. इंजिनिअरच्या विद्यार्थ्याने मित्राचा शिरच्छेद केला, त्यानंतर त्याचं पोट फाडून ह्दय बाहेर काढलं. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याच्या मनात इतकी क्रूरता भरली होती की, त्याने मृतदेहाच गुप्तांग सुद्धा कापलं. मित्र गर्लफ्रेंडला त्रास देतो, या रागातून आरोपीने हे कृत्य केलं.

गुन्ह्याबद्दल समजलं कसं?

मृत युवक 22 वर्षांचा होता. नालगोंडा येथे त्याचं इंजिनिअरींगच शिक्षण सुरु होतं. आरोपी पी. हरी हारा कृष्णाने (21) स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन या भयानक गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या भयानक हत्याकांडाबद्दल समजलं. मृत मुलाच्या कुटुंबीयांनी शनिवारी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करुन न्यायाची मागणी केली.

आधी नवीनचे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते

आरोपी कृष्णा आणि मृत मुलगा नवीन कॉलेजच्या दिवसांमध्ये परस्परांचे वर्गमित्र होते. नवीन कॉलेजच्या दिवसांमध्ये एका मुलीच्या प्रेमात पडला. पण दोन वर्षातच त्यांच्यात भांडण झालं व दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर ती मुलगी आणि कृष्णा यांच्यात जवळीक वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

त्यानंतर कृष्णा त्या मुलीच्या प्रेमात पडला

नवीनला या बद्दल समजल्यानंतर, तो त्या मुलीला मेसेज करायचा. फोन करुन त्रास देऊ लागला. नवीनकडून जो त्रास होत होता, त्या संदर्भात मुलीने तीन महिन्यांपूर्वी कृष्णाला सांगितलं. कृष्णाने त्यावेळीच नवीनला संपवायच ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली.

शहर फिरण्यासाठी म्हणून दोघे बाहेर पडले

17 फेब्रुवारीला आरोपी कृष्णाने नवीनला गेट-टुगेदरच्या बहाण्याने बोलावले. दिलसुखनगर येथील कृष्णाच्या घरी भेट झाल्यानंतर शहर फिरण्यासाठी म्हणून दोघे बाहेर पडले. संध्याकाळ झाल्यानंतर नवीनने कृष्णाला त्याला कॉलेज हॉस्टेलवर सोडण्यास सांगितलं. कृष्णा त्याला हॉस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पेड्डा अंबरपेठ येथील निर्जन वस्तीत घेऊन गेला. कुठून येते इतकी क्रूरता?

रस्त्यात कृष्णा दारु प्यायला व त्याने सूरा विकत घेतला. दारुच्या नशेत कृष्णाने नवीन बरोबर वाद घातला. दोरीने गळा आवळून नवीनची हत्या केली. कृष्णाने त्यानंतर नवीनचा शिरच्छेद केला. त्याचं पोट फाडून ह्दय बाहेर काढलं. हाताची बोटं, गुप्तांग कापलं. त्यानंतर बाईक घेऊन निघून गेला. त्यानंतर कृष्णा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.