Video : हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी, अभिषेक वर्माची जोरदार फलंदाजी
रॉयल चॅलेंजर्स बंगलौरने दिलेलं 68 धावांचं लक्ष्य सनरायजर्स हैदराबादने पूर्ण करून नऊ विकेट्सने विजयी मिळवलाय.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या मोसमातील RCB vs SRH सामन्यात हैदराबाद सनरायजर्स (SRH) नऊ विकेट्सने विजयी झालाय. या सामन्यात हैदराबादच्या अभिषेक शर्माने 28 बॉलमध्ये 47 धावा काढल्या. त्यामध्ये त्याने एक षटकार आणि आठ चौकार लगावले. त्यानंतर केन विलियमसनने सतरा बॉलमध्ये सोळा धावा काढल्या. त्यापैकी त्याने दोन चौकार मारले. राहुल त्रिपाठीने तीन बॉलमध्ये सात धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगलौरने (RCB) दिलेलं 68 धावांचं लक्ष्य सनरायजर्स हैदराबादने पूर्ण करून नऊ विकेट्सने विजयी मिळवलाय. तर दुसरीकडे नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले. दरम्यान, आयपीएलच्या या मोसमात बंगलौरने सर्वाधिक कमी धावा केल्याय.
अभिषेक वर्माने 28 बॉलमध्ये 47 धावा काढल्या, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कोहली कसा आऊट झाला?
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनला गोलंदाजीसाठी बोलावले. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्याच चेंडूवर यान्सेनने क्लीन बोल्ड झाला. डु प्लेसिसनंतर कोहली क्रीझवर आला. विल्यमसनने विराटसाठी मैदान बदलले. त्याने दुसऱ्या स्लिपमध्ये खेळाडूलाही बोलावले. दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एडन मार्कराम दुसऱ्या स्लिपमध्ये राहिला. यानसेनने चेंडू पुढे सरकवला. चेंडू स्विंग होऊन बाहेर जात होता. कोहलीला स्वत:ला रोखता आले नाही आणि चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये मार्करामकडे गेला. विराट अनेकवेळा अशा प्रकारे बाद झाला आहे. त्याचा खास मित्र म्हणवल्या जाणाऱ्या सनरायझर्सचा कर्णधार विल्यमसनने त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला.
विराट कोहलीची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्याच षटकात तीन गडी गमावले. मार्को यानसेनने पहिल्याच षटकात आरसीबीला तिहेरी धक्के दिले. यानसेनने षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांना बाद केले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अनुज रावतलाही बाद केले. सुयश प्रभुदेसाईने पंधरा धावा आणि एक चौकार मारुन तो आऊट झाला. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलौरने दिलेलं 68 धावांचं लक्ष्य सनरायजर्स हैदराबादने पूर्ण करून नऊ विकेट्सने विजयी मिळवलाय.
इतर बातम्या
Special Report | ‘मातोश्री’ऐवजी पोलीस स्टेशनमध्ये Rana दाम्पत्याची रवानगी
Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय