AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं – रवी शास्त्री

"चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आणि कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. रिअल लाईफ रील लाईफ मध्ये उतरवणं इतकं सोप नाहीय. त्यांनी खरोखरच खूप सुंदर काम केलय"

'83' चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं - रवी शास्त्री
83
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:34 PM

नवी दिल्ली: टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi shastri) काल एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांना इक्बाल, लगान, धोनी आणि 83 यापैकी एका चित्रपटाची निवड करण्यास सांगण्यात आले. तुमचा आवडता चित्रपट कोणता? असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर रवी शास्त्री यांनी क्षणाचाही विलंब न लावता 83 असे उत्तर दिले.

“’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी संघाचा एक भाग होतो, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असं नाहीय, हा चित्रपट पाहून काही आठवणी ताज्या झाल्या, माझ्या डोळ्यात पाणी होते” असे रवी शास्त्री यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

“चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आणि कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. रिअल लाईफ रील लाईफ मध्ये उतरवणं इतकं सोप नाहीय. त्यांनी खरोखरच खूप सुंदर काम केलय. पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी मनात ताज्या झाल्या. काही सीन्स पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊ पाहावा असा हा चित्रपट आहे” असे रवी शास्त्री यांनी सांगितले.

शास्त्रींना अजिबात खंत नाही

भारतासाठी 80 कसोटी सामने आणि पाच वर्ष प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या रवी शास्त्रींना आपल्या या वक्तव्याबद्दल अजिबात खंत नाहीय. उलट त्यानंतर अश्विनच्या कामगिरीत सुधारणाच झाली, असे त्यांचे मत आहे. “सिडनी कसोटीत अश्विन खेळला नाही. कुलदीपने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे कुलदीपला संधी देण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे अश्विनला दु:ख झालं असेल, तर मी आनंदीच आहे. कारण त्यामुळे त्याच्यात वेगळं काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. प्रत्येकाचं कौतुक करणं माझं काम नाही. वास्तव सांगण माझं काम आहे” असे शास्त्री म्हणाले.

संबंधित बातम्या:

Harbhajan Singh Retirement: हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा, 23 वर्षांचा क्रिकेटमधला प्रवास संपला Harbhajan Singh: ‘मी मनातून आधीच…’ निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर

परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.