MS Dhoni:…म्हणून रवी शास्त्रींनी कधीही धोनीकडे त्याचा फोन नंबर मागितला नाही

ऑगस्ट 2020 मध्ये एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाला. पण आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतोय.

MS Dhoni:...म्हणून रवी शास्त्रींनी कधीही धोनीकडे त्याचा फोन नंबर मागितला नाही
रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 4:16 PM

मुंबई: भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी एमएस धोनीचं (MS Dhoni) कौतुक केलं आहे. “मी धोनी इतका शांत आणि संयमी व्यक्ती पाहिलेला नाही” असे शास्त्री म्हणाले. “माझ्याकडे अजूनही धोनीचा फोन नंबर नाहीय. धोनीला वाटलं, तर तो बरेच दिवस मोबाइलपासून (Mobile) लांब राहू शकतो” असं शास्त्री यांनी सांगितलं. भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि हेड कोच असताना रवी शास्त्री यांनी एमएस धोनीसोबत काम केलं आहे. धोनी हा भारताचा सर्व फॉर्मेटमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या व्यक्तीमताच्या बाजूवर शास्त्रीने प्रकाश टाकला आहे. “खेळामध्ये चढ-उतार येत असतात, पण म्हणून धोनीचा खेळाबद्दलचा दृष्टीकोन बदलला नाही. मी कधीच धोनीला रागवलेलं पाहिलं नाही” असं शास्त्री म्हणाले.

त्याने धोनीला फरक पडत नाही “धोनी शुन्यावर बाद झाला, त्याने शतक झळकावलं, वर्ल्डकप जिंकला किंवा पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाला, तरी त्याने धोनीला फरक पडत नाही. मी अनेक क्रिकेटपटू बघितले पण त्याच्यासारख कोणीच नाहीय. सचिन तेंडुलकरचाही छान स्वभाव आहे. पण काही वेळा तो रागवतो. पण धोनीच्या बाबतीत असं होत नाही” असं शास्त्री शोएब अख्तरच्या युटयूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

धोनी फोन हातात बाळगणं टाळतो “धोनी फोन हातात बाळगणं टाळतो, अजूनही माझ्याकडे त्याचा नंबर नाहीय. मी कधीही धोनीकडे त्याचा फोन नंबर मागितला नाही. धोनी स्वत: बरोबर त्याचा फोन बाळगत नाही, हे मला ठाऊक आहे. जेव्हा तुम्हाला त्याच्याशी संपर्क साधायचा असतो, तेव्हा त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे तुम्हाला ठाऊक असतो. तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे” असे शास्त्री म्हणाले.

ऑगस्ट 2020 मध्ये एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाला. पण आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतोय. आयपीएलचे चारवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सीएसकेने धोनीला अजूनही आपल्याकडे कायम ठेवले आहे.

I have never asked dhoni for his mobile number Ravi shastri

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.