AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीने क्रिकेटमध्ये केले 8 मोठे बदल, अशी चूक केली तर पाच धावांचा दंड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने काही नियमात बदल केला आहे. यामुळे निर्णय घेताना पारदर्शकता येणार आहे. कसोटी आणि इतर फॉर्मेटमध्ये कॅच पकडण्याच्या नियमात केलेल्या बदलांना आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे. चला जाणून घेऊयात काय ते...

आयसीसीने क्रिकेटमध्ये केले 8 मोठे बदल, अशी चूक केली तर पाच धावांचा दंड
आयसीसीने क्रिकेटमध्ये केले 8 मोठे बदल, अशी चूक केली तर पाच धावांचा दंडImage Credit source: Clive Mason/Getty Images
| Updated on: Jun 26, 2025 | 4:02 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमात काळानुरूप अनेक बदल होत गेले. आता आणखी आठ मुद्दे आयसीसीने निकाली काढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रिकेटचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यात वनडे क्रिकेटमध्ये 35 षटकापर्यंत एकच चेंडू वापरला जाणार आहे. तसेच आयसीसीने कसोटीतही स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. इतकंच काय तर एखादा खेळाडूचा झेल स्पष्ट दिसत नसेल आणि तरी तो बाद आहे यासाठी वाद घातला तर नो बॉल दिला जाईल. असे एकूण आठ नियम 2 जुलैपासून लागू होणार आहेत. चला जाणून घेऊयात काय ते…

टेस्ट क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक : टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागून आहे. आता कसोटीतही हा नियम लागू होणार आहे. कारण कसोटीत स्लो ओव्हर रेट ही मोठी समस्या आहे. नव्या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर दुसरं षटक एका मिनिटाच्या आत सुरु करावं लागेल. जर वेळेत केलं नाही तर दोन वॉर्निंग मिळतील. त्यानंतर प्रत्येक चुकीसाठी पाच धावांची पेनल्टी असेल. 80 षटकानंतर वॉर्निंग रिसेट होईल.

शॉर्ट रनसाठी आता दंड : शॉर्ट रनसाठीही यापूर्वी पाच धावांचं दंड होता. पण नव्या नियमात फलंदाज एक्ट्रा रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक धाव पूर्ण करत नसेल तर अंपायर फिल्डिंग करणाऱ्या संघाला विचारेल की स्ट्राईकला कोण हवं? पण पंचांना फलंदाजाने असं जाणीवपूर्वक केलं असं वाटलं तरच हा नियम लागू होईल.

लाळ लावली तरी चेंडू बदलला जाणार नाही : चेंडूला लाल लावण्याच्या नियमात मोठा बदल झाला आहे. पंचांना चेंड़ूवर लाळ दिसली तर तो लगेच बदलला जाणार नाही. कारण चेंडू बदलण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक लाळ लावतात. आता पंच चेंडू खूपच ओला किंवा त्याचा एक्स्ट्रा चमक असेलतर बदलतील. हा निर्णय पंचांच्या हातात असेल.

आऊट निर्णयानंतर डीआरएस प्रोटोकॉलमध्ये बदल : फलंदाजाला झेल बाद दिलं आणि त्याने रिव्ह्यू मागितला. अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला न लागता पॅडला घासून घेल्याचं दिसलं तर पंच एलबीडब्ल्यू तपासत होते. पण झेल बाद नसेल तर एलबीडब्ल्यूही नाबाद असायचा. पण आता तसं असेल तर फलंदाज बाद असेल.

फलंदाजाविरुद्ध दोन अपील झाली तर… : टीव्ही पंच प्रथम पंचांच्या निर्णायाचा विचार करून नंतर खेळाडूंचा रिव्ह्यू विचारात घेत असत. पण आता फलंदाज पहिल्याच घटनेत बाद झाला तर चेंडू डेड होईल. दुसरा रिव्ह्यू अजिबात तपासला जाणार नाही. उदाहरणार्थ, जर एलबीडब्ल्यू आणि रन आउटसाठी अपील असेल तर टीव्ही पंच प्रथम एलबीडब्ल्यू तपासतील, कारण ते प्रथम घडले. जर फलंदाज बाद झाला तर चेंडू तिथेच डेड होईल.

झेलच्या नियमातही बदल : फिल्डवरील पंचांना झेल घेतला की नाही हे माहिती नसेल तेव्हा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जायची. पण तेव्हा पहिल्यांदा नो बॉल तपासला जात होता. नो बॉल असल्याने पुढे काहीच तपासलं जात नव्हतं. पण आता तिसरा पंच फक्त झेल तपासणार. जर झेल बाद असेल तर संघाला नो बॉलसाठी एक्स्ट्रा रन मिळेल. पण झेल योग्य नसेल तर फलंदाजाने बनवलेल्या धावा संघाला मिळतील.

दोन नवे बदल : वनडे क्रिकेटमध्ये 35 षटकानंतर नवा चेंडू वापरण्याची संधी मिळेल. यामुळे वेगवान गोलंदाजांना डेथ ओव्हर्समध्ये मदत मिळू शकते. दुसरीकडे, सीमेवर झेल पकडताना क्षेत्ररक्षकाला सीमेबाहेर फक्त एकदाच उडी मारून झेल पकडण्याची संधी असेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.