CAN vs US: कॅनडाचा रंगतदार सामन्यात 14 धावांनी पराभव, यूएसची विजयी सुरुवात, कॅप्टन मोनांक मॅन ऑफ द मॅच

Canada vs United States Match Result: मोनांक पटेल याच्या नेतृत्वात यूएसने कॅनडावर 14 धावांनी मात करत विजयी सुरुवात केली आहे.मोनांक याने केलेल्या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

CAN vs US: कॅनडाचा रंगतदार सामन्यात 14 धावांनी पराभव, यूएसची विजयी सुरुवात, कॅप्टन मोनांक मॅन ऑफ द मॅच
us cricket teamImage Credit source: usa cricket x account
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 11:36 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आपली छाप सोडणाऱ्या यजमान यूएसने सातत्यपूर्ण कामगिरी सुरु ठेवली आहे. यूएसने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग स्पर्धेत कॅनडावर रंगतदार झालेल्या सामन्यात 14 धावांनी मात करत विजयी सुरुवात केली आहे. यूएसने कॅप्टन मोनांक पटेल याच्या शतकी खेळीच्या जोरावर कॅनडाला विजयासाठी 305 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं.कॅनडाने या धावांचा पाठलाग करताना चिवट झुंज दिली. मात्र त्यांचे प्रयत्न 14 धावांनी अपुरे पडले. कॅनडाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 290 धावांपर्यंतच मजल मारता आली. यूएसने यासह या स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

यूएसचा 14 धावांनी विजय

कॅनडासाठी हर्ष ठाकेर, आरोन जॉन्सन आणि डिलन हेलिगर या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. हर्ष, डिलन आणि आरोन या तिघांनी अनुक्रमे 77, 56 आणि 55 अशा धावा केल्या. परगत सिंह याने 42 धावांचं योगदान दिलं. या चौघांनी केलेल्या खेळीमुळे कॅनडाला सामन्यात शेवटपर्यंत कायम ठेवलं. मात्र या चौघांशिवाय कॅनडाकडून इतरांना काही योगदान देता आलं नाही. त्यामुळे कॅनडा विजयी आव्हानापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. यूएसएकडून नॉथुश केंजिगे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शॅडली व्हॅन शाल्कविक आणि जसदीप सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.तर हरमीत सिंह आणि स्टीव्हन टेलर या दोघांनी 1-1 विकेट घेत चांगली साथ दिली.

यूएसएची विजयी सुरुवात

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : निकोलस किर्टन (कॅप्टन), आरोन जॉन्सन, दिलप्रीत बाजवा, आदित्य वरदराजन, परगट सिंग, हर्ष ठाकेर, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), साद बिन जफर, डिलन हेलिगर, कलीम सना आणि जेरेमी गॉर्डन.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, स्मित पटेल, आरोन जोन्स, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अभिषेक पराडकर आणि नॉथुश केंजिगे.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.