PAK vs NZ | पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्धचा विजय महागात, नक्की काय झालं?

Pakistan Cricket Team | पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी आटापिटा करतेय. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवला. मात्र त्यानंतरही पाकिस्तानला मोठा झटका लागलाय.

PAK vs NZ | पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्धचा विजय महागात, नक्की काय झालं?
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 5:25 PM

बंगळुरु | पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 35 व्या सामन्यात पावसाच्या कृपेने आणि फखर झमान याच्या वेगवान शतकाच्या मदतीने न्यूझीलंडवर करो या मरो सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानने न्यूझीलंडवर डीएलएसनुसार 21 धावांनी मात केली. न्यूझीलंडला पावसामुळे 401 धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून पाकिस्तानला 402 धावांचं आव्हान मिळालेलं. मात्र पाकिस्तानच्या बॅटिंगदरम्यान पावसाने दोनदा व्यत्यत आणला. पावसामुळे दोन वेळा खेळ थांबवावा लागला. दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तान डीएलएसनुसार 21 धावांनी आघाडीवर होती. पावसामुळे सामना होऊ शकणार नसल्याचं समजताच पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आलं.

पाकिस्तानच्या विजयात फखर झमान निर्णायक भूमिका बजावली. फखरने सुरुवातीपासून विस्फोटक खेळी केल्याने पाकिस्तान डीएलएसच्या नियमानुसार सामन्यात आघाडीवर राहिली. फखरने फक्त 81 बॉलमध्ये 8 चौकार आणि 11 सिक्ससह नाबाद 126 धावा केल्या. तर कॅप्टन बाबर आझम याने नॉट आऊट 66 रन्सचं योगदान दिलं. पाकिस्तानचा हा वर्ल्ड कपमधील सलग दुसरा आणि एकूण चौथा विजय ठरला.

पाकिस्तानने विजय मिळवून सेमी फायनलच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र पाकिस्तानला या विजयानंतर मोठा फटका बसलाय. थेट आयसीसीनेच पाकिस्तानवर मोठी कारवाई केलीय. पाकिस्तानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे (ट्विटर) याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई केली आहे.

नक्की कारण काय?

आयसीसीने पाकिस्तान स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंड विरुद्ध ओव्हर रेट कायम राखलं नाही. त्यामुळे पाकिस्तान टीमला सामन्याच्या मानधनापैकी 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे. नियमांनुसार, ठराविक वेळेत ठराविक ओव्हर टाकाव्या लागतात. मात्र पाकिस्तानने 2 ओव्हर मागे राहिली. पाकिस्तानवर याआधी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यासाठीही अशीच कारवाई करण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानला एका सामन्याच्या मानधाच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली होती.

आयसीसीकडून पाकिस्तानला धक्का

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.