World Cup 2023 Final | न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून OUT, पण फायनलमध्ये त्यांचा ‘हा’ प्लेयर बिघडवू शकतो टीम इंडियाचा खेळ

World Cup 2023 | 20 वर्षानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आहेत. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप झालेला. त्यावेळी फायनलमध्ये दोन्ही टीम आमने-सामने आल्या होत्या. त्या पराभवाचा बदला घेऊन तिसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.

World Cup 2023 Final |  न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून OUT, पण फायनलमध्ये त्यांचा 'हा' प्लेयर बिघडवू शकतो टीम इंडियाचा खेळ
Ind vs Aus World cup 2023 FinalImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 8:29 AM

World Cup 2023 Final | वर्ल्ड कप 2023 ची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये फायनल सामना रंगणार आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये हरवलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ तब्बल 20 वर्षानंतर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने-सामने असतील. 2003 मध्ये सर्वप्रथम या दोन्ही टीम्स फायनलमध्ये आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने बाजी मारलेली. 20 वर्षापूर्वीच्या या पराभवाचा वचपा काढण्याच टीम इंडियाच लक्ष्य असेल.

टीम इंडियाने हा सामना जिंकला, तर तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. याआधी 1983 आणि 2011 मध्ये टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून वर्ल्ड कपमधला त्यांचा प्रवास संपवला. पण फायनलमध्ये त्यांना न्यूझीलंडच्या आणखी एका खेळाडूवर मात करावी लागेल. हा दिग्गज ऑस्ट्रेलियन टीमचा महत्वाचा भाग आहे. तो स्पिन बॉलिंग कोच आहे.

17 वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय

न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर डॅनिएल विटोरी बद्दल आम्ही बोलतोय. विटोरीने 2022 मध्ये कोच पदाची जबाबदारी स्वीकारली होती. विटोरी आपल्या काळातील दिग्गज ऑलराऊंडर्सपैकी एक आहे. 17 वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय. न्यूझीलंडसाठी टेस्टमध्ये 362, वनडे मध्ये 305 आणि T20 मध्ये 38 विकेट घेतलेत. त्याने टेस्टमध्ये 4531, वनडेत 2253 आणि T20 मध्ये 205 धावा केल्या आहेत.

18 व्या वर्षी डेब्यु

विटोरीने वयाच्या 18 व्या वर्षी न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2007 मध्ये त्याने टीमच नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडची टीम 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली. त्याशिवाय 2007 च्या T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल आणि 2011 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड टीमने धडक मारली होती. 2015 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला नमवलं, त्यानंतर विटोरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. ऑस्ट्रेलियाच्या आधी तो बांग्लादेश टीमचा कोच होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.