ICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने जून महिन्यातील ICC Players of the Month पुरस्कारासाठी जून महिन्यात अप्रतिम खेळ केलेल्या खेळाडूंना नामांकित केले आहे. महिला खेळाडूंमध्ये दोन भारतीय क्रिकेटपटूंचा समावेशा आहे.
मुंबई : प्रत्येक महिन्याला क्रिकेट चाहते आणि दिग्गजांच्या मतदानातून महिन्याभरात क्रिकेटच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या एका पुरुष आणि महिला खेळाडूला ICC Players of the Month पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी प्रेक्षक स्वत:ही मतदान करु शकतात. त्यासाठी काही महिनाभरातील अप्रतिम खेळाच्या जोरावर आयसीसी (ICC) तीन पुरुष आणि तीन महिलांची नावं नामांकित करते. त्यानंतर दिग्गजांची मतं आणि प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतदानाद्वारे विजयी खेळाडू ठरतो. दरम्यान यंदा महिला गटात दोन भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश असून पुरुष गटात मात्र एकाही भारतीयाचा समावेश नाही. (ICC Players of the Month June Nominees Announced indias Shefali verma and sneh rana both are in list)
ICC Players of the Month June साठी नामांकित केलेल्या भारतीय महिला खेळाडूंची नावं शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि स्नेह राणा (Sneh Rana) अशी आहेत. भारतीय महिला सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. एकमेव टेस्ट सामना अनिर्णीत सुटल्यानंतर एकदिवसीय सामन्यांत भारत 2-1 च्या फरकाने मालिका हारला. पण यावेळी नुकतेच भारचीय संघात पदार्पण केलेल्या शेफाली वर्मा आणि 5 वर्षानंतर संघात परतलेल्या स्नेह राणाने अप्रतिम खेळी केली. शेफालीने कसोटी सामन्यात पहिल्या डावांत 96 आणि दुसऱ्या डावात 63 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यातही शेफालीने 78 धावा कुटल्या. दुसरीकडे स्नेहने कसोटी सामन्यात 82 धावांसह 4 विकेटही पटकावल्या आणि एकदिवसीय सामन्यातही तिने अष्टपैलू खेळी केली. विशेषता अखेरच्या सामन्यातील तिच्या 24 धावा भारतासाठी विजयी धावा ठरल्या. या दोघींच्या याच कामगिरीमुळे त्यांना नामांकित केले आहे. तर या दोघींशिवाय इंग्लंडकडून उत्कृष्ठ गोलंदाजी करणाऱ्या सोफी इक्लेस्टोन (Sophie Ecclestone) हिलाही नामांकित केलं आहे. पुरुष गटात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) अप्रतिम कामिगिरी करणाऱ्या डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) यांना नामांकन देण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक कॉन्टन डीकॉकला (Quinton de Kock) वेस्ट इंडिडच्या दौैऱ्यातील धडाकेबाज कामगिरीसाठी त्यालाही नामांकित केले आहे.
The thrilling #ENGvIND series has thrown up all three nominees for the women’s #ICCPOTM for June ?
Get your votes in!
?️ https://t.co/ukFFact9iF pic.twitter.com/GMd4358iq7
— ICC (@ICC) July 7, 2021
मे महिन्यातील विजेते
मे महिन्यातील पुरुष गटातील हा पुरस्कार बांग्लादेशचा माजी कर्णधार मुशफिकुर रहीम ( Mushfiqur Rahim) याला देण्यात आला आहे. तर महिला गटात स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रायस (Kathryn Bryce) हिचा सन्मान करण्यात आला होता. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मुशफिकुर रहीमने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने 3 एकदिवसीय सामन्यांत तब्बल 237 धावा केल्या. ज्यात एका सामन्यात 125 आणि एका सामन्यात 84 धावांचा समावेश होतो. तर कॅथरीनने आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील 4 सामन्यात 5 विकेट्ससह 96 धावा देखील केल्या. स्कॉटलंड चार पैकी तीन सामन्यांत पराभूत झाला असला तरी कॅथरीनच्या अष्टपैलू खेळीमुळे तिला ICC Players of the Month पुरस्कार देण्यात आला आहे.
हे ही वाचा –
ICC Players of the Month : 3 एकदिवसीय सामने, 237 धावा, ‘या’ खेळाडूने मारली बाजी
M S Dhoni Birthday : क्रिकेटपटूंकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव, विराटचं कॅप्शन मन जिंकणारं
शुभमनच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर, वाचा किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार
(ICC Players of the Month June Nominees Announced indias Shefali verma and sneh rana both are in list)