ipl लिलावात कोणीच रूपयाही नाही सोडला, पठ्ठ्या आता टी-20 मध्ये जगातील नंबर दोनचा बॅट्समन
T-20 ICC Ranking : आयपीएलच्या लिलावामध्ये त्याला प्रत्येकाने दाखवला होता रेड सिग्नल, आता पठ्ठ्याने सर्वांनाच दाखवून दिली की त्यांनी किती मोठी चुक केलीये. एक रूपयाही नाही कोणी सोडला पण आता त्यानेच थेट आयसीसीचं वेधलं लक्ष.
मुंबई : आयपीएल 2024 चा लिलाव पार पडला आता सर्वांना आयपीएलची प्रतीक्षा आहे. या लिलावामध्ये एक असा खेळाडू जो अनसोल्ड राहिला. पठ्ठ्याने सलग दोन सामन्यांमध्ये शतके केलीत तरीसुद्धा त्याला कोणत्याचा फ्रँचायसीने बोली लावली नाही. आता हाच खेळाडू टीम इंडियाचा मॅचविनर सूर्यरकुमार यादव याला जड जाण्याची शक्यता आहे. या खेळाडूला कोणीही बोली न लावल्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून फिल साल्ट आहे. आताच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 मालिकेत साल्टने दमदार फलंदाजी केली होती. या मालिकेमध्ये साल्ट याने दोन दमदार शतके झळकवली होतीत. आयसीसी जाहीर केलेल्या ताज्या रँकिंग यादीमध्ये त्याला मोठा फायदा झाला आहे. साल्ट याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूने सूर्यकुमार यादव याला धक्का दिला आहे. क्रमवारीत 802 च्या रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव अजूनही पहिल्या स्थानावर आहेत. ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव 887 रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. वन डे फॉरमॅटमधील यादीमध्ये पाकिस्तान संघाचा बाबर आझम 824 रेटिंगसह टॉपल आहे. शुबमन गिल 801 रेटिंगसह दोन नंबरला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे 768 आणि 746 रेटिंगसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, आयपीएल लिलावाआधी साल्टने दोन शतके केली होतीत. त्यामुळे लिलावामध्ये त्याच्यावर मोठी बोली लावली जाईल असं बोललं जात होतं. मात्र त्याला कोणीच बोली लावली नाही, हा इंग्लिश खेळाडू आयपीएल लिलावामध्ये अनलकी ठरला.