World Cup | वर्ल्ड कपसाठी 15 टीम क्वालिफाय, पाहा पूर्ण यादी
Icc World Cup | आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापर्यंत एकूण 15 संघानी क्वालिफाय केलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमही पात्र ठरली आहे.
मुंबई | यंदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताला मिळाला आहे. भारतात 2011 नंतर आता 12 वर्षांनी म्हणजेच 2023 मध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. या वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रही जाहीर केलं गेलंय. त्यानुसार 5 ऑक्टोबरला सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सलामीचा आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
या वर्ल्ड कपसाठी आयसीसी क्वालिफायर स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघानी क्वालिफाय केलं. विशेष बाब म्हणजे नेदरलँडने 2011 नंतर वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. नेदरलँड वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होणारी दहावी आणि शेवटची टीम ठरली. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीचे 10 संघ निश्चित झाले. तर दुर्देवाने वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप स्पर्धेत विंडिज टीम खेळताना दिसणार नाही.
तर दुसऱ्या बाजूला आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी आतापर्यंत एकूण 15 संघांनी क्वालिफाय केलंय. त्यामुळे आता 5 जागांसाठी उर्वरितसंघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका इथे संयुक्तरित्या 2024 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. गुरुवारी 27 जुलै रोजी एकूण 3 संघांनी या वर्ल्ड कपसाठीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीचे 15 संघ निश्चित झालेत.
टी 20 वर्ल्ड कप 2024 बाबत महत्वाची माहिती
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेची सुरुवात जून महिन्यापासून होणार आहे. या स्पर्धेसाठी टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील पहिल्या 8 टीम्ससह आयसीसी रँकिंगमधील टॉप 10 मधील 2 संघ थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलंय. तसेच यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही संघांनाही डायरेक्ट एन्ट्री मिळाली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी 27 जुलैला 2 संघ पात्र ठरले. डेनमार्कवर 33 धावांनी विजय मिळवत स्कॉटलँडने क्वालिफाय केलं. तर जर्मनी विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंडने वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. तर आता 5 संघही लवकर निश्चित होतील.
दरम्यान आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, पपुआ न्यू गिनी, स्कॉटलँड, टीम इंडिया, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, साऊथ आफ्रिका आणि नेदरलँड या 15 संघांनी क्वालिफाय केलंय.