ICC T20 World Cup India Squad : टीम इंडियाची घोषणा, दीपक चहरसह 4 खेळाडू संघातून बाहेर
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हातात असणार आहे. तर उपकर्णधार केएल राहुल याला बनवण्यात आलंय. बुमराह यांचं देखील पुनरागमन झालंय.
नवी दिल्ली : बीसीसीआयनं (BCCI) एक मोठी घोषणा केली आहे. टी-20 (T-20) विश्वचषकासाठी बीसीसीआयनं संघाची घोषणा केली आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रोलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) टीमची घोषणा केली आहे. आता या टीमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात असणार आहे. तर उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला बनवण्यात आलंय. विशेष म्हणजे या संघात जसप्रीत बुमराह यांचं देखील पुनरागमन झालंय.
बीसीसीआयचं ट्विट
? NEWS: India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2022.
Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (WK), Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, R. Ashwin, Y Chahal, Axar Patel, Jasprit Bumrah, B Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh
— BCCI (@BCCI) September 12, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रुसो, ट्रिस्टन शाम्सी, ट्रिब्स, सेंट.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडिया:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
अॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, अॅडम.
संघातील स्टार्स कोण?
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या मोठ्या नावांची निवड आधीच निश्चित झाली होती. कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त अशा खेळाडूंमध्ये केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. हे असे खेळाडू आहेत जे संघाचे नियमित सदस्य देखील आहेत.
पहिला सामना कधी?
T20 विश्वचषक 22 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना मेलबर्न येथे होणार आहे.
रोहितच्या नेतृत्वावर सर्वकाही….
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती तेव्हाच आयसीसीचे शेवटचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर धोनीचे युग संपले. विराट कोहलीचा कर्णधारपदाचा खेळही संपला. पण, भारतीय संघाला आयसीसी विजेतेपदाचा आनंद घेता आला नाही. अशा स्थितीत संपूर्ण देशाच्या नजरा आता विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या निवडलेल्या संघावर लागून राहिल्या आहेत. या आशेने सगळे बघत आहेत. ही आशा आता संपेल असं क्रिकेटप्रेमींना वाटतं. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळले नाहीत. पण आता तो तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे.