IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, कॅप्टन बदलला, ‘करो या मरो’ सामन्यात भारताची बॅटिंग की बॉलिंग?

India Women vs Australia Women Toss: टीम इंडियासाठी साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना हा 'करो या मरो' असा आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात अजिंक्य अशा कांगारुंचं आव्हान आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, कॅप्टन बदलला, 'करो या मरो' सामन्यात भारताची बॅटिंग की बॉलिंग?
ind vs aus tossImage Credit source: bcci women x account
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 7:56 PM

आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत.दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीचे तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर टीम इंडियाने पहिला सामना गमावल्यानंतर सलग 2 विजय मिळवले. त्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवावा लागणार आहे. उभयसंघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. या सामन्यात एलिसा हीली हीच्या अनुपस्थितीत ताहिला मॅक्ग्रा नेतृत्व करत आहे. एलिसाला दुखापत झाल्याने ताहिलाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ताहिलाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केले आहेत. तर भारतीय संघात कर्णधार हरमनप्रीत कौर हीने एक बदल केला आहे. प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊयात.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

नियमित कर्णधार एलिसा हीली पूर्णपणे फिट नसल्याने ती या सामन्यातून बाहेर पडली आहे. या व्यतिरिक्त टायला व्लामिनक आधीच स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अशात या दोघांच्या जागी संघात ग्रेस हॅरीस आणि डार्सी ब्राऊन या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडिया पूजा वस्त्राकार हीला एस सजना हीच्या जागी संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….