World Cup 2024 | 7 महिन्यांनी पुन्हा वर्ल्ड कप, रोहित-विराट खेळणार की नाही?

Icc T20I World Cup 2024 | टीम इंडियाने पहिला आणि अखेरचा टी 20 वर्ल्ड कप हा 2007 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात जिंकला होता. तेव्हापासून टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलेलं नाही. आता पुढील टी 20 वर्ल्ड कप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

World Cup 2024 | 7 महिन्यांनी पुन्हा वर्ल्ड कप, रोहित-विराट खेळणार की नाही?
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 6:14 PM

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकले. टीम इंडियाने उंपात्य फेरीत न्यूझीलंडवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्ड कप 2019 सेमी फायनलचा वचपा घेतला. आता टीम इंडिया वर्ल्ड कपपासून फक्त एक पाऊल दूर होती. मात्र वर्ल्ड कप आणि टीम इंडिया यांच्यात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा अडथळा होता. टीम इंडियाला कांगारुंवर विजय मिळवून विश्व विजेता होण्याची संधी होती. मात्र टीम इंडिया अंतिम सामन्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली.

फायनलमध्ये पराभूत झाल्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला भर मैदानात रडू आलं. तसेच इतर खेळाडूही भावूक झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंचं सांत्वनही केलं. आता पुढील वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला 4 वर्षांची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे. मात्र त्याआधी 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला 2007 नंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे.

टी 20 वर्ल्ड कप केव्हा?

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 मध्ये जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे वेस्टइंडिज आणि अमेरिकाकडे संयुक्तरित्या आहे. या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेचं वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही. या स्पर्धेचं वेळापत्रक काही दिवसांनी प्रसिद्ध होणार आहे.

विराट-रोहित खेळणार की नाही?

टीम इंडिया गत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पराभूत झाली. तेव्हापासून टी 20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू खेळत नाही. सध्या हार्दिक पंड्या याच्याकडे टीम इंडियाच्या टी 20 च्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू हे टी 20 क्रिकेट खेळत नसल्याचं म्हटलं जात गोतं. मात्र आता टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं असणं आणखी फायदेशीर ठरेल. त्यामुळे आता विराट-रोहित 7 महिन्यांनी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.