Rohit Sharma : रोहित शर्मा याचा भीमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार
टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला पछाडत अव्वल स्थान गाठलं. यासह टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 132 धावा आणि 1 डावाने विजय मिळवला होता. टीम इंडियाला या विजयाने मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने टीम इंडियाला या कामगिरीचं बक्षिस दिलं. टीम इंडिया कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत 1 नंबर टीम ठरली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. टीम इंडियाला 1 नंबर करताच रोहित शर्मा याच्या नावावरही मोठा रकॉर्ड झाला आहे.
रोहित शर्मा टीम इंडियासाठी वनडे, कसोटी आणि टी 20 या तिन्ही प्रकारात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतोय. उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितच्या नेतृत्वातच टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानी पोहचली आहे. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वलस्थानी पोहचवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.
टीम इंडियाचे रेटिंग्स पॉइंट्स
टेस्ट रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 115
टी-20 रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 267
वनडे रँकिंग, टीम इंडिया, नंबर 1, रेटिंग्स पॉइंट्स – 114
रोहित शर्मा आठव्या स्थानी
रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात शानदार 120 धावांची शतकी खेळी केली. रोहितने या खेळीत 15 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. रोहितच्या या शतकामुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचली. रोहितला या शतकी खेळीचा फायदा हा टेस्ट रँकिंगमध्ये झाला. रोहित आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
रोहितची कसोटी कारकिर्द
रोहितने आतापर्यंत 46 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने या 78 डावांमध्ये 47.20 च्या सरासरीने 3 हजार 257 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 9 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली आहेत.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.