297 रन्स, 11 विकेट आणि वर्ल्ड चॅम्पियन, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाच्या ‘या’ 4 स्टार
U-19 WC Final : टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलय. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली ही टीम दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली, त्यावेळी ही टीम वर्ल्ड कप फायनल जिंकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
U-19 WC Final : टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलय. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली ही टीम दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली, त्यावेळी ही टीम वर्ल्ड कप फायनल जिंकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण या टीमने कमाल केली. रविवारी फायनलमध्ये याच टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंडला सात विकेटने हरवून वर्ल्ड कप जिंकला. मिताली राज आणि हरमनप्रीत कौरला जे जमलं नाही, ते काम शेफालीने करुन दाखवलं. फायनलमध्ये टीम इंडियासमोर इंग्लिश टीमच काहीच चाललं नाही. टीमच्या या विजयात चार खेळाडूंच महत्त्वपूर्ण योगदान आहे.
- टीम इंडियाची सलामीवीर श्वेता सेहरावतने या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्वेताने या टुर्नामेंटध्ये एकूण सात मॅचेसमध्ये 99 च्या सरासरीने 297 धावा केल्या. या दरम्यान तिने तीन अर्धशतक फटकावली. 92 ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात तिने 92 धावा केल्या होत्या.
- पार्श्वी चोपडाने गोलंदाजीत दम दाखवला. ती टीमची स्टार लेग स्पिनर ठरली. सहा सामन्यात तिने 11 विकेट काढले. श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट काढल्या. न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये तीन विकेट काढल्या. फायनलमध्ये दोन विकेट काढल्या.
- मन्नत कश्यप या गोलंदाजाने सुद्धा टीमच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजने 6 सामन्यात 9 विकेट काढल्या. कश्यपने फायनलमध्ये एक विकेट काढला.
- कॅप्टन शेफाली वर्माने टीमच चांगलं नेतृत्व केलं. शेफाली वर्मा सिनीयर महिला क्रिकेट टीमसोबत 2020 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली आहे. तिने टीमच नेतृत्व करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनुभवाचा वापर केला. टीमच चांगलं नेतृत्व केलं. शेफालीने बॅटने सुद्धा चांगली कामगिरी केली. तिने 7 सामन्यात 172 धावा केल्या.