AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 Schedule | आयसीसीचं ठरलं! ‘या’ तारखेला वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होणार

Icc World Cup 2023 Schedule Date | भारताला यंदा तब्बल 12 वर्षांनंतर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. जाणून घ्या या वर्ल्ड कपचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार?

Icc World Cup 2023 Schedule | आयसीसीचं ठरलं! 'या' तारखेला वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होणार
| Updated on: Jun 24, 2023 | 5:32 PM
Share

मुंबई | आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे. भारत या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन करणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. मात्र आयसीसीकडून अजून या वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे वेळापत्रक कधी जाहीर होतंय, याकडे लागलंय. विशेष म्हणजे क्रिकेट विश्वाचं लक्ष भारत-पाक सामन्याकडे लागून राहिलंय. मात्र आता आयसीसीने क्रिकेट चाहत्यांची वेळापत्रकाची प्रतिक्षा संपवलीय.

आयसीसीने आज शनिवारी 24 जून रोजी वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करण्याची तारीख सांगितली आहे. आयसीसीने माध्यमांना आमंत्रित केलंय. आयसीसीने या आमंत्रण पत्रिकेत वर्ल्ड कप वेळापत्रकाचा कार्यक्रम कुठे होणार याबाबतची माहिती दिली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक हे 27 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आयसीसीच्या या कार्यक्रमाला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमांच आयोजन हे मुंबईतील लोअर परळ येथील एस्टर बालरुन, सेंट रेजिस इथे करण्यात आलं आहे.

वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार?

एकूण 10 संघांचा सहभाग

या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 पैकी 8 संघाना थेट एन्ट्री मिळाली आहे. थोडक्यात काय तर पहिले 8 संघ हे निश्चित आहेत. मात्र उर्वरित 2 जागांसाठी आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर राउंड खेळवण्यात येत आहे. या क्वालिफायर राउंडचं आयोजन हे झिंबाब्वेमध्ये करणयात आलंय. झिंबाब्वेत 18 जून ते 9 जुलैदरम्यान एकूण 10 संघांमध्ये 34 सामने खेळवण्यात येणार आहेत.

थेट पात्र ठरलेले संघ

टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका असे एकूण 8 संघ हे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. तर 2 जागांसाठी 10 संघात रस्सीखेच आहे. झिंबाब्वे, वेस्टइंडिज, श्रीलंका, नेदरलंड, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई अशा या 10 संघांमध्ये 2 जागांसाठ वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या 10 मधून पहिले 2 संघ हे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.