SAW vs NZW Toss : दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंडची बॅटिंग
South Africa Women vs New Zealand Women Final Toss: वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
क्रिकेट विश्वाला आज 20 ऑक्टोबरला नवा विश्वविजेता संघ मिळणार आहे. आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप ट्रॉफीसाठीच्या महामुकाबल्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन लॉरा वोल्वार्ड हीने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता या अंतिम सामन्यात न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे साऱ्यांचं आता लक्ष असणार आहे.
दोन्ही टीम अनचेंज
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने या महत्त्वाच्या आणि अंतिम सामन्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. दोन्ही सघांनी आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. विजयी संघातील अंतिम 11 खेळाडूंमध्ये सहसा बदल केला जात नाही. त्यानुसारच दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हन अनचेंज ठेवली आहे.
दोन्ही संघांचा इथवरचा प्रवास
दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा साखळी फेरीपर्यंतचा प्रवास हा सारखाच राहिला आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसरा सामना गमावला. तर त्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. तर न्यूझीलंडने विंडिजला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता या दोन्ही संघात अगदी काही मिनिटांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सामना रंगणार आहे.
न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डिव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.
दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा आणि अयाबोंगा खाका.