INDvsAUS | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल, सामन्याबाबत सर्वकाही एका क्लिकवर

महिला टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये गतविजेच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होणार आहे.

INDvsAUS | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल, सामन्याबाबत सर्वकाही एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 6:08 PM

केपटाऊन | वूमन्स टीम इंडिया टीमने टी 20 वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा 20 फेब्रुवारीला 5 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली आहे. टीम इंडिया आता वर्ल्ड कप जिंकण्यापासून फक्त 2 विजय दूर आहे. टीम इंडियाचा गेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. आता त्याच गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये सामना होणार आहे.

टीम इंडियाकडे हा सामना जिंकून मागील पराभवाचा वचपा आणि फायनलमध्ये पोहचण्याची अशी दुहेरी संधी आहे. दरम्यान हा सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे. या निर्णायक सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. तसेच हॉटस्टारवर ही सामना पाहता येईल. तसेच सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठी वेबसाईट्सवर मिळतील.

साखळी फेरीतील कामगिरी

टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर विडिंजला पराभूत केलं. टीम इंडियाने अशा प्रकारे सलग 2 सामन्यात विजय मिळवला. मात्र इंग्लंडने टीम इंडियाचा विजयीरथ रोखला. इंग्लंडने भारताला हरवंल. पण टीम इंडियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला. यासह सेमीफायनलमध्ये धडक मारली.

रिचा-स्मृतीकडून अपेक्षा

या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला रिचा घोष आणि नॅशनल क्रश सांगलीकर स्मृती मंधानाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. रिचा स्पर्धेच्या सुरुवातीपासून खेळून आली आहे.

रिचाची कामगिरी

टीम इंडियाने वर्ल्ड कप मोहिमेत आतापर्यंत पाकिस्तान, विंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध 4 सामने खेळले. यात आयर्लंडचा अपवाद वगळता रिचाने सातत्याने शानदार कामगिरी केली.

पाकिस्तान

रिचाने 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. रिचाने 18 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं. जेमिमाह आणि रिचा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची विजयी आणि तितकीच निर्णायक भागीदारी केली.

विंडिज

रिचाने 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली. रिचाने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला.

इंग्लंड

रिचाने इंग्लंड विरुद्ध 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्समध्ये 47 धावांची खेळी केली. मात्र रिचा आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरली. रिचा आयर्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाली.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर आणि राजेश्वरी गायकवाड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.