IND W VS ENG W: मिताली राज ड्रेसिंग रुममध्ये पुस्तक वाचत बसते, मग धावा कोण बनवणार?
ICC WWC 2022: आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) आज टीम इंडियाचा इंग्लंडने पराभव केला. इंग्लंडसमोर भारतीय महिला संघाने (England Women vs India Women) फक्त 136 धावांचं माफक लक्ष्य ठेवलं होतं.

ICC WWC 2022: आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) आज टीम इंडियाचा इंग्लंडने पराभव केला. इंग्लंडसमोर भारतीय महिला संघाने (England Women vs India Women) फक्त 136 धावांचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा बचाव करणं कठीण होतं. इंग्लंडच्या महिला संघाने चार विकेटने सामना जिंकला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. टीम इंडिया गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे उर्वरित दोन सामने बलाढय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आहेत. हे दोन्ही संघ सध्या फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंड विरुद्ध सामन्यात मिताली राजच्या (Mithali Raj) प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मागच्या तीन सामन्यांप्रमाणे मिताली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही फ्लॉप झाली. भारतीय कर्णधार मितालीने फक्त एक रन्स केला.
मिताली पुस्तक वाचत बसते
मिताली आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसून पुस्तक वाचत होती. मिताली अनेकदा ड्रेसिंग रुममध्ये पुस्तक वाचताना दिसते. तिच्या पुस्तक वाचण्याबद्दल काही समस्या नाही, पण प्रश्न हा आहे की, ती न्यूझीलंडमधल्या खेळपट्ट्यांवर धावा कधी करणार? चार सामने झाले आहेत. मितालीच्या प्रदर्शनात सुधारणा झालेली नाही. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कमकुवत गोलंदाजीसमोरही ती खेळपट्टीवर टीकू शकली नाही.
मिताली राजची दयनीय कामगिरी
मितालीने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फक्त नऊ धावा केल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने 31 धावा केल्या. वेस्ट इंडिज विरुद्ध पाच आणि आता इंग्लंड विरुद्ध फक्त एक रन्स केला. चार सामन्यात मिताली राजने फक्त 46 धावा केल्या आहेत. तिची सरासरी 12 पेक्षाही कमी आहे. एवढय मोठ्या स्पर्धेत मितालीचं प्रदर्शन खरोखरच खूप खराब आहे. मिताली राजचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामनेही सोपे नाहीत.
मितालीने फलंदाजांवर फोडलं खापर
मिताली राजने इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर खापर फोडलं. “आम्ही भागीदाऱ्या केल्या नाहीत. टॉस हरल्यानंतर परिस्थिती आमच्यासाठी प्रतिकुल होती. धावफलकावर 200 धावा लागल्या असत्या, तर सामन्याचा निकाल दुसराही लागू शकला असता” असे मिताली म्हणाली. मिताली राजला हे समजून घेणं गरजेचं आहे, ती खेळपट्टीवर टिकली असती, तर 200 धावा झाल्या असत्या.
संबंधित बातम्या: IPL 2022: युजवेंद्र चहल Rajasthan Royals चा नवीन कॅप्टन? नक्की काय आहे भानगड? टीम इंडियाच्या जबाबदारीतून सुट्टी, रोहित-बुमराह मुंबई इंडियन्सच्या कंपूत दाखल, किशनलाही NCA कडून क्लीन चिट IND vs ENG, Live Score, Women’s World Cup 2022: भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो, इंग्लंडची भारतावर 4 विकेट आणि 112 चेंडू राखून मात