IND vs PAK, WWC 2022: पाकिस्तान विरोधात सांगलीच्या स्मृती मानधनाची कमाल, टीमसाठी बनली संकटमोचक

IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत आजपासून भारताच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तान विरोधात (India vs Pakistan) सुरु आहे.

IND vs PAK, WWC 2022: पाकिस्तान विरोधात सांगलीच्या स्मृती मानधनाची कमाल, टीमसाठी बनली संकटमोचक
सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) भोपळाही न फोडता तंबूत परतली. पण त्यानंतर सांगलीच्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) कमालीचा खेळ दाखवत डाव सावरला. डावखुऱ्या स्मृतीने दीप्ती शर्मासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 4:07 PM

IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत आजपासून भारताच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तान विरोधात (India vs Pakistan) सुरु आहे. कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) भोपळाही न फोडता तंबूत परतली. पण त्यानंतर सांगलीच्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) कमालीचा खेळ दाखवत डाव सावरला. डावखुऱ्या स्मृतीने दीप्ती शर्मासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. डावाला आकर देत स्मृतीने पाया रचण्याचं काम केलं. स्मृती फलंदाजीसाठी मैदानात उतरतील, त्यावेळी खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल वाटत नव्हती. शेफाली वर्माच्या विकेटने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या अशावेळी स्मृतीने आपल्या अनुभवाचा बळावर सावध-संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी स्मृती मानधनाने दीप्ती शर्मासोबत मिळून शानदार अर्धशतकी भागीदारी केली. स्मृतीने फलंदाजी करताना धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. दीप्ती शर्मा 40 धावांवर आऊट झाली. भारतीय संघासाठी तो दुसरा धक्का होता.

स्मृती मानधनाचं 21 वं अर्धशतक

स्मृती मानधनाने 75 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. स्मृतीने तिच्या वनडे करीयरमधलं 21 व अर्धशतक झळकावलं. आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील भारताचं हे पहिलं अर्धशतक आहे. वर्ल्डकपच्या इतिहासातील स्मृतीचं हे तिसरं अर्धशतक आहे. पाकिस्तान विरोधात स्मृतीचं हे पहिलं अर्धशतक आहे.

सर्वाधिक धावा करणारी चौथी भारतीय

या अर्धशतकासह स्मृतीने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. महिला वनडे स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी चौथी फलंदाज बनली आहे. स्मृतीने 65 वनडे मॅचेसमध्ये 2513 धावा केल्या आहेत. सध्या ती चौथ्या स्थानावर आहे. मिताली राज, अंजूम चोपडा आणि हरमनप्रीत कौर तिच्या पुढे आहेत.

महिला वनडे में सर्वाधिक धावा बनवणारे भारतीय

भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मिताली राज टॉपवर आहे. तिने 226 वनडे सामन्यात 7600 धावा केल्या आहेत. अंजून चोपडा यांनी 127 वनडेमध्ये 2856 धावा केल्या आहेत. त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. हरमनप्रीत कौर 112 वनडेत 2660 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अन्य तिघींच्या तुलनेत धावांच्या बाबतीत स्मृती वेगाने पुढे गेली आहे. असंच तिचं प्रदर्शन कायम राहिलं तर करीयरच्या शेवटी ती या यादीत टॉपवर असेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.