SA vs SL | Kusal Mendis पेटला, 6 गगनचुंबी षटकारांसह सनसनाटी अर्धशतक
South Africa vs Sri Lanka Kusal Mendis Fifty | कुसल मेंडीस याने 429 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला शानदार सुरुवात करुन दिलीय. कुसलने या दरम्यान विक्रमी अर्धशतक ठोकत दक्षिण आफ्रिका टीमच्या गोलंदाजांची धुलाई केलीय.
नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमने श्रींलकाला विजयासाठी 429 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. श्रीलंकेचं या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पाथुम निसांता झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर विकेटकीपर बॅट्समन कुसल मेंडीस पेटून उठला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना झोडलं. त्याच ताकदीने कुसल मेंडीसने आफ्रिकेच्या गोलंदाचांना चोपला. कुसलने पावर प्लेचा चांगलाच फायदा घेत आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. कुसलने 6 खणखणीत सिक्स ठोकत सनसनाटी अर्धशतक पूर्ण केलं.
कुसलने सिक्स खेचत 25 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. कुसलने या दरम्यान 3 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 204 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं. कुसल यासह आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत वेगवान अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला. तसेच कुसल श्रीलंकेकडून वेगवान अर्धशतक करणारा तिसरा बॅट्समन ठरला.
आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 मधील वेगवान अर्धशतक
कुसल मेंडीस (श्रीलंका), 25 बॉल, विरुद्ध दक्षिण आफ्रिका.
सौद शकील (पाकिस्तान), 32 बॉल, विरुद्ध नेदरलँड्स.
डेव्हॉन कॉनव्हे (न्यूझीलंड), 36 बॉल, विरुद्ध इंग्लंड.
रचिन रवींद्र (न्यूझीलंड), 36 बॉल, विरुद्ध इंग्लंड.
श्रीलंकासाठी वेगवान अर्धशतक
एंजलो मॅथ्युज विरुद्ध स्कॉटलँड, 20 बॉल.
दिनेश चांदीमल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 22 बॉल.
कुसल मेंडीस विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 25 बॉल.
कुसल मेंडीस अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकत खेळत होता. कुसलच्या वेगवान खेळीची श्रीलंकेला गरज होती. त्यानुसार कुसल खेळतही होता. मात्र कुसलच्या वेगवान खेळीला कगिसो रबाडा याने ब्रेक लावला. कगिसो 42 बॉलमध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावा करुन आऊट झाला.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीप), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका आणि कसून राजिथा.