ZIM vs WI 2023 | झिंबाब्वेचा वेस्ट इंडिजवर 35 धावांनी विजय, सिंकदर रजा याचा धमाका
Zimbabwe vs West Indies ICC World Cup Qualifier | सिंकदर रजा हा झिंबाब्वेच्या विजयाचा हिरो ठरला. सिंकदरने वेस्टइंडिज विरुद्धच्या या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली.
हरारे | क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधीही कुणाला गृहीत धरु नये किंवा कमी लेखू नये, असं कायम म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये तर शेवटचा बॉल टाकला जात नाही, तोवर कोण जिंकेल, याचा अंदाज बांधणं धाडसी समजलं जातं. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात. सध्या झिंबाब्वेमध्ये आगामी वनडे वर्ल्ड कप क्वालिफाय स्पर्धा सुरु आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघ निश्चित आहेत. तर उर्वरित 2 संघ हे वर्ल्ड कप क्वालिफाय स्पर्धेतून निश्चित होणार आहेत.
या स्पर्धेतील 13 वा सामना आज 24 जून रोजी पार पडला. या सामन्यात 2 वेळा वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन राहिलेल्या वेस्टइंडिज विरुद्ध झिंबाब्वेचा आमनसामना झाला. झिंब्बावे म्हणजे लिंबूटिंबू समजला जाणारी टीम. पण याच झिंब्बावेने विंडिजला पाणी पाजलंय. झिंब्बावेने वेस्टइंडिजवर 35 धावांनी विजय मिळवलाय. सिंकदर रजा हा झिंबाब्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
झिंबाब्वेचा 35 रन्सने विजय
Zimbabwe ???
The hosts register a terrific win over West Indies to assert their supremacy in the #CWC23 Qualifier ?#CWC23 | ZIMvWI: https://t.co/wJIQndg4XH pic.twitter.com/l2Bw138Ngb
— ICC (@ICC) June 24, 2023
सामन्याचा धावता आढावा
वेस्टइंडिजने टॉस जिंकला. झिंब्बावेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेकडून सिंकद रजा याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. रायन बर्ल याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन क्रेग एर्विन याने 47 धावांचं योगदान दिलं. या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. या जोरावर झिंबाब्वेने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 268 धावांपर्यंत मजल मारली. झिंबाब्वेने विंडिजला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं . मात्र झिंबाब्वेने विंडिजचा 44.4 ओव्हरमध्ये 233 धावांवर बाजार उठवला.
विंडिजकडून कायले मेयर्स याने सर्वाधिक 56 धावा केल्या. रोस्टन चेस याने 44 धावा जोडल्या. निकलोस पूरन 34 धावांवर आऊट झाला. कॅप्टन शाई होप 30 रन्स करुन माघारी परतला. ओपनर ब्रँडन किंग 20 धावांवर आऊट झाला. उंचपुरा जेसन होल्डरने 19 धावा जोडल्या. या 5 जणांनी चांगली आणि दणकेदार सुरुवात केली. मात्र यांना टीमला जिंकवता आलं नाही. अकेल होसेन याने नाबाद 3 धावा केल्या. तर उर्विरत 4 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
झिंब्बावेकडून तेंडाई चतारा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानी सिंकदर रजा आणि रिचर्ड नगारावा या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर वेलिंग्टन मसाकादझा याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन | क्रेग एर्विन (कॅप्टन), जॉयलॉर्ड गुम्बी, वेस्ली माधेवरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रजा, रायन बर्ल, क्लाइव्ह मदंडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
वेस्टइंडिज प्लेइंग इलेव्हन | ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ आणि अकेल होसेन.