WI vs NED | विंडिजला पुन्हा एकदा झटका, सुपर ओवरमध्ये नेदरलँडचा विजय

West Indies vs Netherlands Super Over | आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळाला. वेस्टइंडिज विरुद्ध नेदरलँड यांच्यातील सामना टाय झाला. त्यानंतर नेदरलंडने विंडिजला सुपर ओव्हरमध्ये पाणी पाजलं.

WI vs NED | विंडिजला पुन्हा एकदा झटका, सुपर ओवरमध्ये नेदरलँडचा विजय
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 12:42 AM

हरारे | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील नवव्या आणि दहाव्या स्थानासाठी क्वालिफायर स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण दहासंघांमध्ये फक्त 2 जागांसाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना आज 26 जून रोजी चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. वेस्टइंडिज विरुद्ध नेदरलँड यांच्यात हरारेत सामना पार पडला. हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये गेला. या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने बाजी मारली. त्यामुळे 2 वेळा वर्ल्ड कर जिंकलेल्या वेस्टइंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विंडिजला सलग दुसऱ्यांदा झिंबाब्वेनंतर आता नेदरलँड विरुद्ध उलटफेराचा सामना करावा लागला.

वेस्टइंडिजने पहिले बॅटिंग करताना 6 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 374 धावा केल्या. त्यामुळे नेदरलँडला विजयासाठी 375 धावांचं आव्हान मिळालं. नेदरलँडनेही या 375 धावांचा शेवटच्या चेंडूपर्यंत शानदार पाठलाग केला. मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आता सामन्याचा निकाल आता सुपर ओव्हरने लागणार होता.

हे सुद्धा वाचा

सुपर ओव्हरचा थरार

विंडिजकडून उंचपुऱ्या जेसन होल्डर याने सुपर ओव्हर टाकली. नेदरलँडच्या लोगन वान बीक याने होल्डरचा चांगलाच समाचार घेतला.लोगन याने होल्डरला धु धु धुतला. सुपर ओव्हरमध्ये लोगनने पहिल्याच बॉलवर फोर ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिक्स आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा चौकार ठोकला. त्यानंतर सलग 2 सिक्स ठोकले. तर शेवटच्या बॉलवर फोर मारला. अशाप्रकारे लोगन आणि नेदरलँडच्या सुपर ओव्हरमध्ये 30 धावा झाल्या. त्यामुळे विंडिजला 31 धावांचं आव्हान मिळालं.

बॅटिंगने धमाल केल्यानंतर नेदरलँडकडून लोगननेच सुपर ओव्हर टाकली. लोगनने या सुपर ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावाच दिल्या. तसेच विंडिजने पहिल्या 5 बॉलमध्येच 2 विकेट्स गमावल्या. अशाप्रकारे नेदरलँडचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.

नेदरलँड सुपर ओव्हरमध्ये विजयी

वेस्टइंडिज प्लेइंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, कीमो पॉल, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.

नेदरलँड प्लेइंग इलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स ओडॉड, विक्रमजीत सिंग, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, क्लेटन फ्लॉइड, आर्यन दत्त आणि व्हिव्हियन किंगमा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.