श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा
भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला अत्यंत सहजतेने (India Beats Sri Lanka) 2-0 ने हरवलं. ही सीरीज पूर्णपणे एकतर्फी झाली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने सरस कामगिरी केली.
बंगळुरु: भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला अत्यंत सहजतेने (India Beats Sri Lanka) 2-0 ने हरवलं. ही सीरीज पूर्णपणे एकतर्फी झाली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने सरस कामगिरी केली. कसोटीच्या कुठल्याही सत्रात श्रीलंकेचा संघ भारताला त्या तोडीची टक्कर देतोय, असं अजिबात वाटलं नाही. भारताने मोहाली कसोटी डावाने जिंकली होती, तर या कसोटी सामन्यात 238 धावांनी मोठा विजय मिळवला. क्रिकेटच्या एक मोठ्या फॉर्मेटमध्ये रोहित शर्माने विजयी सुरुवात केली आहे. फक्त रेकॉर्डच्या दृष्टीने भारतासाठी हा विजय खास नाहीय, तर आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही (ICC World Test Chaampionship) भारताला फायदा झाला आहे. सीरीजचे दोन्ही सामने जिंकून भारताने WTC पॉईंटस टेबलमध्ये (ICC WTC Points Table) मोठी झेप घेतली आहे. टीम इंडिया आता WTC पॉईंटस टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटस सिस्टिममध्ये प्रत्येक टेस्टसाठी 12 पॉईंटस मिळतात. म्हणजे प्रत्येक विजयासाठी 12 पॉईंटस. टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकून 24 पॉईंटस मिळवलेत. चार कसोटी मालिकेत सहा विजय, तीन पराभव आणि दोन ड्रॉ सह एकूण 77 पॉईंट झालेत. पर्सेटेंज पॉईंटस सिस्टिमनुसार, भारतीय संघाकडे 100 पर्सेंट पॉईंटसपैकी एकूण 58.33 पर्सेंट पॉईंटस आहे. भारतीय संघ श्रीलंकेला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
WTC मध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन
मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यापासून टीम इंडियाने कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या चक्राची सुरुवात केली होती. भारताला इंग्लंडमध्ये चार कसोटी सामन्यात दोघांमध्ये विजय मिळाला होता. एक टेस्ट ड्रॉ झाली होती. एका कसोटी सामन्यात पराभव झाला होता. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या दोन कसोटीपैकी एक कसोटी सामना जिंकला, तर एक ड्रॉ झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव झाला. त्याचा टीम इंडियाला फटका बसला होता.