UAE मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणार कायरन पोलार्ड, ILT20 साठी 14 खेळाडूंच्या नावाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीग साठी पाच खेळाडू विकत घेतल्यानंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने UAE इंटरनॅशनल टी 20 लीग मधील आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीग साठी पाच खेळाडू विकत घेतल्यानंतर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने UAE इंटरनॅशनल टी 20 लीग मधील आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. IPL T20 मध्ये अबू धाबी फ्रेंचायजी विकत घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने 14 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात कायरन पोलार्ड सर्वात प्रसिद्ध नाव आहे. पोलार्ड आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पोलार्ड 2010 पासूनच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. पोलार्ड शिवाय मुंबईने ड्वेन ब्राव्हो आणि ट्रेंट बोल्ट सारख्या आपल्या जुन्या स्टार्सनाही करारबद्ध केलं आहे. दिग्गज ऑलराऊंडर ब्राव्हो IPL च्या सुरुवातीच्या सीजन मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्यानंतर तो चेन्नई सुपरकिंग्सकडे गेला.
ट्रेंट बोल्टने करार संपवला
ट्रेंट बोल्ट 2020 आणि 2021 सीजन मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. बोल्टने नुकताच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डा बरोबरचा आपला सेंट्रल करार संपुष्टात आणला. त्यामुळे आता फ्रेंचायजीला त्याच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही अडचण येणार नाही.
निकोलस पूरनही MI एमिरेट्स मध्ये
मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा फलंदाज विल स्मीडलाही आपल्यासोबत जोडलं आहे. युवा फलंदाज स्मीडने अलीकडेच ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या दुसऱ्यासीजनमध्ये शतक झळकावलं. या स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनला सुद्धा MI एमिरेट्सने करारबद्ध केलं आहे.
MI एमिरेट्सचे असे आहेत 14 खेळाडू
कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, ड्वेन ब्राव्हो, निकोलस पूरन, इमरान ताहिर, आंद्रे फ्लेचर, नजीबुल्लाह जादरान, जहीर खान, फजलहक फारुकी, समित पटेल, विल स्मीड, जॉर्डन थॉम्पसन, ब्रॅड व्हील आणि बॅस डिलीड