VIDEO – 46 बॉलमध्ये सेंच्युरी, दोन दिवसात दुसरं शतक, 178 धावांच टार्गेट ठरलं फुसका बार
दक्षिण आफ्रिकेत विल जॅक्स, जॉस बटलर आणि फिल सॉल्ट यांचा जलवा पहायला मिळतोय. यूएईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल T20 लीगमध्ये सुद्धा इंग्लिश बॅट्समन आपल्या बॅटची ताकत दाखवतायत.
डरबन – दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये इंग्लिश फलंदाजांचा बोलबाला आहे. विल जॅक्स, जॉस बटलर आणि फिल सॉल्ट यांचा जलवा पहायला मिळतोय. यूएईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल T20 लीगमध्ये सुद्धा इंग्लिश बॅट्समन आपल्या बॅटची ताकत दाखवतायत. टुर्नामेंटच्या पहिल्या आठ मॅचमध्ये एकही शतक झालं नव्हतं. आता सलग दोन सामन्यात दोन सेंच्युरी झळकवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 20 जानेवारीला डेजर्ट वायपर्सचा ओपनर एलेक्स हेल्सने टुर्नामेंटमधील पहिलं शतक झळकावलं. आता इंग्लंडच्याच टॉम कोलर कॅडमोरने धुवाधार सेंच्युरी ठोकलीय.
सहज पार केलं लक्ष्य
शनिवारी 21 जानेवारीला दुबईमध्ये शारजाह वॉरियर्सने दुबई कॅपिटल्सने दिलेलं टार्गेट अगदी सहज पार केलं. ओपनर टॉम कोलप कॅडमोरची बॅट तळपली. या सामन्यात दुबई कॅपिटल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 4 विकेट गमावून 177 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर शारजाह वॉरियर्सच्या कॅडमोरने दुबईच्या बॉलर्सचा चांगलाचा समाचाऱ घेतला. त्यांनी 14.3 ओव्हर्समध्ये फक्त 3 विकेट गमावून लक्ष्य पार केलं.
T20 करीअरमधील पहिली सेंच्युरी
28 वर्षाचा टॉम कोलप कॅडमोर हा बॅट्समन टी 20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतोय. क्रीजवर येताच या इंग्रज फलंदाजांना आक्रमक बॅटिंग सुरु केलीय. कॅडमोरने फक्त 19 चेंडूत 50 धावा चोपल्या. यात 6 फोर आणि 3 सिक्स होते. त्यानंतर तो शांत बसला नाही. 46 चेंडूत सेंच्युरी ठोकली.
It was raining runs and records in Dubai, today! ?
106 off 47 balls! Simply WOW!
What an awesome WIN for the @SharjahWarriors, courtesy @tomkohlerreal!
Book your tickets at https://t.co/VekRYhpzz6 #DPWorldILT20 #ALeagueApart #DCvSW pic.twitter.com/XdGKQsTxrd
— International League T20 (@ILT20Official) January 21, 2023
किती फोर? किती सिक्स?
कॅडमोरने फक्त 47 चेंडूत 106 धावा ठोकून टीमला मोठा विजय मिळवून दिला. कॅडमोरने त्याच्या इनिंगमध्ये 10 फोर आणि 6 सिक्स मारले. कॅडमोरच टी 20 क्रिकेटमधील हे पहिलं शतक आहे. जो रुटची तळपली बॅट
दुबई कॅपिटल्सकडून खेळणारा इंग्लंडचा दिग्गज बॅट्समन जो रुटने दमदार बॅटिंग केली. रुटने 54 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. टीमचा कॅप्टन रोव्हमॅन पॉवेलने 27 चेंडूत 44 धावा कुटल्या. या दोघांच्या इनिंगच्या बळावर दुबईने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 177 धावा केल्या.