IML 2025 Final : इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचं आव्हान, विंडीज मास्टर्स रोखणार?
India Masters vs West Indies Masters Final : लेंडी सिमन्स याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात ब्रायन लारा याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्सला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 148 धावा केल्या. इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी विंडीजच्या स्फोटक फलंदाजांसमोर चिवट बॉलिंग करत त्यांना 150 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. त्यानंतर आता इंडिया मास्टर्सच्या फलंदाजांवर पुढील जबाबदारी असणार आहे.
विंडीज मास्टर्ससाठी लेंडल सिमन्स याने सर्वाधिक धावा केल्या. सिमन्सने 41 बॉलमध्ये 139.02 च्या स्ट्राईक रेटने 57 धावांची खेळी केली. सिमन्स या खेळीत 1 षटकार आणि 5 चौकार ठोकले. त्याशिवाय ओपनर ड्वेन स्मिथ याने 2 षटकार आणि आणि 4 चौकारांसह 45 धावांचं योगदान दिलं. तर विकेटकीर दिनेश रामदिन याने नाबाद 12 धावा केल्य. या तिघांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कॅप्टन ब्रायन लारा, विल्यम पर्किन्स आणि चाडविक वॉल्टन या तिघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. रवी रामपॉलने 2 धावांचं योगदान दिलं. तर अॅशले नर्स याने 1 धाव केली.
इंडिया मास्टर्सकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली.मात्र त्यापैकी इरफान पठाण आणि धवल कुलकर्णी या दोघांना विकेट मिळवण्यात अपयश आलं. विनय कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शादाब नदीम याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पवन नेगी आणि स्टूअर्ट बिन्नी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
इंडिया मास्टर्ससमोर 149 धावांचं आव्हान
One Innings Away from 𝐆𝐥𝐨𝐫𝐲! 🏆#WestIndiesMasters have done their bit 🎯 Now, can #IndiaMasters rise to the challenge and script the 👌 finish? 🔥
Watch the Grand Finale 👉 LIVE now on @JioHotstar, @Colors_Cineplex & @CCSuperhits! 📺📲#IMLT20 #TheBaapsOfCricket pic.twitter.com/SNHUcqCNTU
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 16, 2025
इंडिया मास्टर्स प्लेइंग इलेव्हन : सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (विकेटकीपर), पवन नेगी, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम आणि धवल कुलकर्णी.
वेस्ट इंडिज मास्टर्स प्लेइंग इलेव्हन : ब्रायन लारा (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, चाडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), अॅशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन आणि रवी रामपॉल.