Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात मी निर्णय घेतले पण श्रेय दुसऱ्यानेच घेतलं, अजिंक्य रहाणेच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे?

पण शांत-संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेने अखेर 'बॅकस्टेज विथ बोरीया' (Backstage with Boria) कार्यक्रमात मौन सोडलं व टीकाकारांना उत्तर दिलं.

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात मी निर्णय घेतले पण श्रेय दुसऱ्यानेच घेतलं, अजिंक्य रहाणेच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे?
अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 2:56 PM

मुंबई: मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममुळे सातत्याने टीकेचा सामना करणाऱ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) अखेर मौन सोडलं आहे. त्याच्या करीयरबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना अजिंक्य रहाणेने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मागच्यावर्षी अजिंक्य रहाणेच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकली होती. अजिंक्य रहाणे मेलबर्नवरील विजयाचा नायक ठरला होता. पण सध्या हाच रहाणे अनेकांना खुपतोय. त्याच्या क्रिकेट करीयरबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातायत. अजिंक्य रहाणे असा व्यक्ती नाहीय, की, जो रोज व्यक्त होईल. त्याच्याबद्दल लिहिल्या जाणाऱ्या बातम्यांवर किंवा टीकाकारांना लगेच प्रत्युत्तर देईल. पण शांत-संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेने अखेर ‘बॅकस्टेज विथ बोरीया’ (Backstage with Boria) कार्यक्रमात मौन सोडलं व टीकाकारांना उत्तर दिलं.

या वक्तव्याचे पुढचे काही दिवस पडसाद उमटतील ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक 2020-21 दौऱ्याबद्दल अजिंक्य रहाणेने एक वक्तव्य केलय, ज्याचे पडसाद पुढचे काही दिवस उमटण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणे मागची दोन वर्ष संघर्ष करतोय. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते अजिंक्य रहाणेचे करीयर उतरणीला लागलय. रहाणेचा भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळून झालाय, असं अनेकांना वाटतं. अजिंक्यच्या मते, ज्यांना क्रिकेट समजतं, ते अशा प्रकारची वक्तव्य करणार नाहीत.

अजिंक्य रहाणेचा रोख नेमका कोणाकडे?

‘बॅकस्टेज विथ बोरीया’ कार्यक्रमात अजिंक्य रहाणेने मौन सोडलं व करीयर संबंधीच्या तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल भाष्य केलं. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचं नेतृत्व केलं. रहाणेने प्रथमच एक मोठं विधान केलं आहे. “मैदानात तसंच ड्रेसिंग रुममध्ये मी काही निर्णय घेतले पण कोणी दुसऱ्यानेच त्याचं श्रेय घेतलं” असं रहाणे म्हणाला. अजिंक्य रहाणेचा रोख नेमका कोणाकडे आहे, ते स्पष्ट झालेलं नाही.

तेव्हा मी फक्त हसतो

“माझ करीयर संपलं, असं लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा मी फक्त हसतो. ज्यांना खेळ समजतो, ते असं बोलणार नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि त्याआधी काय झालं? ते सगळ्यांना माहित आहे. खेळावर प्रेम करणारे विवेकाने बोलतील” असं अजिंक्य म्हणाला.

दवंडी पिटण्याचा माझा स्वभाव नाही

“ऑस्ट्रेलियातील सीरीजमध्ये मी काय केलं, ते मला माहित आहे. दवंडी पिटून एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा माझा स्वभाव नाही. काही निर्णय मी घेतले होते. पण दुसऱ्यानेच त्याचं श्रेय घेतलं. मालिका विजय माझ्यासाठी महत्त्वाचा होता, असे रहाणेने मुलाखतीत सांगितलं. व्यक्तीगत श्रेयापेक्षा संघाचा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे” असं रहाणेनं सांगितलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच एडलेड कसोटीत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या मेलबर्न कसोटीत शतक ठोकून भारताच्या विजयात रहाणेने महत्त्वाची भूमिका बजावली. सिडनी कसोटी भारताने ड्रॉ केली आणि अखेरची गाबामधील कसोटी जिंकून भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. या दौऱ्यातील फक्त पहिल्या कसोटीत विराटने संघाचं नेतृत्व केलं. उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये रहाणेनं नेतृत्व केलं.

संबंधित बातम्या: Rohit sharma: ‘चल पळ तिथे’, भर मैदानात रोहित शर्मा युजवेंद्र चहलवर चिडला पहा VIDEO IPL Auction 2022: एकाच संघाचे किती मालक? कोण दिवाळखोर झालं, कोणाकडे किती टक्के शेअर्स, जाणून घ्या सर्वकाही… IPL Auction ने एकारात्रीत बदललं आयुष्य, रिक्षावाला, फळवाला आणि पाणीपुरीवाल्याचा मुलगा झाला करोडपती

In Australia I had taken some decisions but someone else took credit Ajinkya Rahane

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.