वय झालं, पण Wasim Akram चा इनस्विंग यॉर्कर आजही तितकाच खतरनाक, कशा दांड्या उडवल्या, ते VIDEO मध्ये पहा
वसीम अक्रमने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना माइक आर्थटनला जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला. वसीम अक्रमच्या त्या चेंडूचं आर्थटनकडे कुठलही उत्तर नव्हतं.
मुंबई: पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमच (Wasim Akram) नाव निघालं की, आजही त्याची डावखुरी वेगवान गोलंदाजी आठवते. वसीन अक्रमचा रनअप छोटा होता. पण त्याच्या चेंडूंना प्रचंड गती असायची. अक्रमने रिव्हर्स स्विंग (Reverse Swing) आणि इन स्विंग यॉर्करने एक काळ गाजवला. भले-भले दिग्गज फलंदाज वसीम अक्रमच्या यॉर्करसमोर ढेपाळले. पाकिस्तानचा माजी कर्णधार (Pakistan Former captain) वसीम अक्रमने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे. वसीम अक्रम 2003 मध्ये शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर तब्बल 19 वर्षानंतर वसीम अक्रम पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसला. एका प्रदर्शनीय सामन्यात वसीन अक्रमने आपल्या गोलंजाजीची जादू दाखवली. त्याने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील मुख्य अस्त्र इन स्विंग यॉर्करने इंग्लंडचा माजी कर्णधार माइक आर्थटनच्या यष्टया वाकवल्या.
‘त्या’ चेंडूच आर्थटनकडे कुठलही उत्तर नव्हतं
वसीम अक्रमने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना माइक आर्थटनला जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला. वसीम अक्रमच्या त्या चेंडूचं आर्थटनकडे कुठलही उत्तर नव्हतं. त्याने अक्रमच्या चेंडूसमोर थेट शरणागतीच पत्करली. वसीम अक्रमने टाकलेल्या उत्कृष्ट यॉर्करचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आर्थटनच्या Reaction वरुनच वसीम अक्रमचा हा चेंडू किती खतरनाक होता, त्याची कल्पना येते. आर्थटनच्या Reaction वरुन त्याच्यासाठी हा चेंडू खेळणं खूप कठीण होतं, एवढच लक्षात आलं. वसीन अक्रमच्या खेळाचे जगभरात चाहते आहेत. त्याची गोलंदाजी पाहताना एक वेगळा आनंद मिळायचा.
A classic @wasimakramlive inswinging yorker is too good for Michael Atherton! ??
These legends are playing in the @WellbeingofWmen Celebrity Charity Match in remembrance of the great Shane Warne ? pic.twitter.com/7GwcCL97kP
— Cricket District ? (@cricketdistrict) June 19, 2022
आर्थटनच्या नावावर 68 शतकं
वसीम अक्रमने कसोटी सामन्यात 414 विकेट काढल्या. वनडे मध्ये 502 विकेट अक्रमच्या नावावर आहेत. पाकिस्तानात फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना त्याने 1042 विकेट काढल्या. दुसरीकडे माइक आर्थटनने 115 कसोटी सामन्यात 37 पेक्षा जास्त सरासरीने 7728 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 16 शतकं झळकावली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 54 आणि लिस्ट ए मध्ये 14 शतकं ठोकली आहेत. म्हणजेच त्याने त्याच्या करीयरमध्ये 68 शतकं झळकावली.