AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह कपिलदेव यांचे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना भारतीय खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आहे.

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह कपिलदेव यांचे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत संधी
जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 2:05 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यानंतर आता तिसरा कसोटी सामना लीड्स (Leeds) येथे 25 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी तर महत्त्वाचा असेलच पण भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.  शर्मा आणि बुमराह या दोघांनाही महान खेळाडू  कपिल देव (Kapil Dev) यांचा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे.

आता तुम्ही विचार करत असाल एक फलंदाज आणि एक गोलंदाज कोणता रेकॉर्ड तोडणारा आहे. पण हा एक रेकॉर्ड नसून दोन वेगवेगळे रेकॉर्ड आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे अष्टपैलू असल्याने त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी केली आहे. तर त्यांचे हे तुटू शकणारे दोन रेकॉर्डपैकी एक आहे, कसोटी क्रिकेटमधील षटकार ठोकण्याशी संबधित तर दुसरा आहे वेगवान 100 कसोटी विकेट्स घेण्याचा.

एक षटकार आणि रोहित तोडणार कपिल देव यांचा रेकॉर्ड

कपिलदेव यांनी 131 कसोटी सामन्यात 184 डावांत 2 हजार 831 धावा केल्या आहेत. ज्यात 61 षटकार त्यांनी ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्यामध्ये सेहवाग, धोनी आणि सचिननंतर ते चौथ्या स्थानी आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने 41 टेस्ट सामन्यांत 70 डावांत 61 षटकार ठोकवे आहेत. त्यामुळे आणखी एक षटकार ठोकताच तो कपिल देव यांच्या रेकॉर्डला मागे टाकून तो चौथ्या नंबरवर पोहोचेल.

कपिलदेवच्या रेकॉर्डपासून बुमराह 5 विकेट दूर

कपिलदेव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवानगतीने 100 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वात वेगवान गतीने ही कामगिरी करणारे ते प्रथम भारतीय आहेत. त्यांनी अवघ्या 25 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. आता जसप्रीत बुमराहकडे हा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे. तो 100 विकेटपासून केवळ 5 विकेट दूर आहे. बुमराहने आतापर्यंत 22 कसोटी सामन्यात 95 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लीड्समधील तिसरे कसोटीत तो 5 विकेट घेताच सर्वाधिक गतीने 100 विकेट पूर्ण करणारा खेळाडू बनेल.

इतर बातम्या

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा

(In india vs england 3rd test at leeds Rohit sharma and Jasprit bumrah can break kapil dev record)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.