IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. पण तिसऱ्या सामन्यात मात्र भारतीय फलंदाजानी अत्यंत खराब प्रदर्शन करत सामन्याची सुरुवात केल्याने संघाला हा सामनं जिंकण अवघड झालं आहे.
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकामागोमाग एक फलंदाजाना तंबूत परतावे लागत आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीवर घाव करणारा इंग्लंडचा खेळाडू आहे जेम्स एंडरसन (James Anderson). जबरदस्त गोलंदाजी करत जेम्सने भारतीय संघाला (Team India) मोठ्या अडचणीत टाकलं आहे. तसंच अँडरसन आणि भारतीय संघ यांच्यातील एक योगायोग या कसोटीत पुन्हा समोर आल्याने भारताचा विजयही निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.
अँडरसनने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये केएल राहुलला (KL Rahul) शून्यावर बाद केले. मागील दहा वर्षात चौथ्यांदा भारतीय संघाने कसोटी सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये इंग्लडविरुद्ध गडी गमावला आहे. विशेष म्हणजे चारही वेळाही कमाल जेम्स अँडरसनने केली आहे.
‘हा’ आहे योगायोग
तर गोष्ट अशी आहे की, मागील काही वर्षात ज्या ज्या वेळी पहिल्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनने भारतीय संघाच्या सलामीवीराला बाद केलं आहे. तो सामना भारत पराभूत झाला आहे. सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीतही पहिल्या ओव्हरमध्ये केएल राहुलच्या बॅटला लागून बॉल यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. ज्यामुळे भारताचा पहिला गडी पहिल्या ओव्हरमध्ये शून्य धावा करुन बाद झाला. 2011 पासून हा योगायोग सुरु आहे. याआधी 2018 च्या दौऱ्यात मुरली विजयला अँडरसनने पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावर बाद केलं होतं. तो सामना भारत एक डाव आणि 159 धावांनी पराभूत झाला. त्याआधी 2014 मध्ये गौतम गंभीरला अँडरससने पहिल्या ओव्हरमध्ये शून्यावर बाद केलं होतं. तो सामना भारताने एक डाव 244 धावांनी गमावला होता. त्याआधी 2011 मध्येही जेम्सने अभिनव मुकुंदला पहिल्या चेंडूवरच शून्यावर बाद केलं होतं. तोही सामना इंग्लंड 319 धावांनी जिंकली होती. त्यामुळे आता सुरु असलेल्या सामन्यातही इंग्लंड जिंकू शकते असं म्हटलं जात आहे.
भारत विरुद्ध जेम्स अँडरसन
जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत 33 टेस्टमध्ये त्याने 130 विकेट्स घेतले आहेत. 20 धावा देत पाच विकेट्स घेणं हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. भारताविरुद्ध त्याने पाच वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनने सर्वाधिक कसोटी सामने (33) भारताविरुद्धच खेळले आहेत.
हे ही वाचा
IND vs ENG 3rd Test Day 1 Live: भारताला पाचवा झटका, ऋषभ पंत दोन धावा करुन बाद
IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती
(In india vs england third test james anderson breaks indian batting order india may loose third test)