KKR vs RCB : शाहरुखसाठी विराटने नाही केली दुखापतीची पर्वा, फक्त एका शब्दावर पुरी केली डिमांड, VIDEO

Virat kohli and Shahrukh Khan: मैदानावर मॅचनंतर एक वेगळं दुश्य पहायला मिळालं. आयपीएल 2023 च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला हरवलं.

KKR vs RCB : शाहरुखसाठी विराटने नाही केली दुखापतीची पर्वा, फक्त एका शब्दावर पुरी केली डिमांड, VIDEO
virat kohli - shahrukh khanImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:38 AM

KKR vs RCB IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्सने IPL 2023 मध्ये आपला पहिला विजय मिळवलाय. त्यांनी आपल्या घरच्या मैदानात इडन गार्डन्स स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध विजय मिळवला. कोलकाताने बँगलोरवर 81 धावांनी विजय मिळवला. मॅचमध्ये बँगलोरची बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरली. कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीची बॅट विशेष चालली नाही. विराट कोहलीच फुटवर्क बॅटिंग करताना चाललं नाही. पण केकेआरचा मालक शाहरुख खानसोबत त्याच्या फुटवर्कने धमाल केली.

कोलकाताने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेट गमावून 204 धावा केल्या. बँगलोरची टीम 17.4 ओव्हर्समध्ये 123 रन्सवर ऑलआऊट झाली. या मॅचनंतर दोन्ही टीम्सच्या प्लेयर्समध्ये जुगलबंदी पहायला मिळाली. यावेळी कोहली आणि शाहरुखच्या जोडीने जे काम केलं, ते कोणीच करु शकलं नाही.

धावत जाऊन गळाभेट

मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम्सने खेळाडू परस्पराबरोबर चर्चा करत होते. या दरम्यान कोलकाता टीमचा मालक शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. कोहलीला पाहताच शाहरुख खान त्याच्या दिशेने धावत गेला व त्याची गळाभेट घेतली. त्यानंतर काहीवेळ दोघे बोलले.

पायाला दुखापत झाली होती

या मॅचमध्ये कोहलीच्या पायाला दुखापत झाली होती. शाहरुख खानने संभवत: त्याच दुखापतीबद्दल विचारपूस केली. कोहली शाहरुख खानला भेटला, त्यावेळी त्याच्या पायावर पट्टी बांधलेली होती. शाहरुखने कोहलीला पठाण चित्रपटातील गाण्यावर काही स्टेप्स करायला सांगितल्या.

व्हिडिओ व्हायरल होतोय

शाहरुखने शिकवलं, त्या प्रमाणे कोहलीने हळूहळू स्टेप्स केल्या. कोहलीने प्रयत्न केला व एक-दोनवेळा आपला पाय उचलला. त्यानंतर कोहली आणि शाहरुख दोघे हसायला लागले. दोघे काहीवेळ बोलले. सोशल मीडियावर कोहली आणि शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा

कोहलीने आयपीएल 2023 च्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये शानदार बॅटिंग केली होती. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळला होता. या मॅचमध्ये बँगलोरची टीम जिंकली होती. कोहलीची बॅट या मॅचमध्ये जोरदार चालली होती. त्याने मुंबई विरुद्ध नाबाद 82 धावा फटकावल्या होत्या. पण केकेआर विरुद्ध दुसऱ्या सामन्यात कोहली फ्लॉप ठरला. त्याने 18 चेंडूत 3 फोरच्या मदतीने 21 धावा केल्या. बँगलोरच्या टीमला पुढच्या काही सामन्यात कोहलीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...