AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs MI 2023 : मुंबईच्या पहिल्या विजयानंतर रोहितला मैदानातच एका खास व्यक्तीचा VIDEO कॉल

DC vs MI IPL 2023 : मुंबईच्या विजयात रोहित शर्माच महत्वाच योगदान. रोहितने काल 45 चेंडूत 65 धावा फटकावल्या. रोहितने सुरुवातीलाच आक्रमण करुन दिल्लीच्या गोलंदाजीतील हवा काढून टाकली.

DC vs MI 2023 : मुंबईच्या पहिल्या विजयानंतर रोहितला मैदानातच एका खास व्यक्तीचा VIDEO कॉल
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 9:57 AM

DC vs MI IPL 2023 : सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मध्ये पहिला विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सने हरवलं. टीमच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने सुद्धा सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मा मैदानात असतानाच त्याला एका खास व्यक्तीचा फोन आला होता. रोहित त्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

रोहितच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, त्याची बायको रितिका सजदेह आहे. मुंबई इंडियन्सच्या सीजनमधील पहिल्या विजयानंतर रितिकाने रोहितला व्हिडिओ कॉल केला होता.

जे बोलत होते, घडलं सुद्धा तसच

मुंबई इंडियन्सला सीजनला पहिला सामना जिंकायचा असेल, तर रोहित शर्माची बॅट तळपली पाहिजे, असं सर्वांचच म्हणण होतं. रोहितने आघाडीवर राहून टीमसमोर उदहारण ठेवलं पाहिजे, असं क्रिकेट विश्लेषक सांगत होते. कालच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात घडलं सुद्धा तसच. रोहितने स्वत: टीमच्या विजयात महत्वाच योगदान दिलं.

रोहितच आयपीएलमधील 41 व अर्धशतक

दिल्लीने दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने इशान किशनच्या साथीने टिमला चांगली सुरुवात दिली. रोहितने 45 चेंडूत 65 धावा केल्या. यात 6 फोर आणि 4 सिक्स होते. मुंबईला शेवटच्या चेंडूवर 2 रन्सची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. रोहितच आयपीएलमधील हे 41 व अर्धशतक आहे. दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने 6 विकेटने हरवलं. टीमच्या या विजयात रोहित शर्माचे फिफ्टी, पीयूष चावलाची गोलंदाजी आणि टिम डेविड-कॅमरुन ग्रीनच्या भागीदाराच योगदान आहे. मुंबई इंडियन्सने सामना जिंकला असला, तरी पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.