IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूंमध्ये मैदानात अनेकदा वादा-वादी झाल्याचं दिसून आलं. यावेळी जसप्रीत बुमराह आणि जेम्स अंडरसन यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती
जो रुट आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 2:19 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्स येथे (Lords Ground) झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला. दोन्ही संघामधील वादामुळे मैदानावर अनेकदा पंचाना दोन्ही संघाच्या खेळाडूंना शांत करावे लागले. विशेष म्हणजे हा वाद केवळ मैदानापुरता मर्यादीत न राहता लाँग रूमपर्यंतही गेला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) यांच्यात हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर लॉर्ड्सवरील दुसऱ्या सामन्यात भारत विजयी झाला. ज्यामुळे भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. पण याच सामन्यादरम्यान पण दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना स्लेजिंग केल्याचे समोर आले होते.

मैदानाबाहेरही खेळाडूंमध्ये वाद

टेलीग्राफ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि जो रूट के यांच्यात वाद झाला होता. तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सेशनमध्ये जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनला बाऊन्सर टाकत हैराण केलं होतं. पण दुसरीकडे जो रूट मात्र नाबाद 180 धावांवर राहिला. त्यामुळे दिवसाचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघ लाँग रूममध्ये पोहचले तेव्हाही  कोहली आणि रूट यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेंकाना खडे बोल सुनावले. विराटने सागितल्याप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूंनीच त्यांना वाद घालण्यास भाग पाडलं होतं. तर रुटनुसार त्याला या सगळ्यात काही रस नसून खेळ सर्वात महत्त्वाचा आहे त्यानंतर या सर्व गोष्टी असं त्याने सांगितलं.

हे ही वाचा

PAK vs WI :पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची कमाल, एका सामन्यात वेस्ट इंडिजचे 10 विकेट्स घेत मिळवला विजय

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(In second test at lords Joe root and virat kohli exchanged words in long room of the ground)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.