ICC Elite Panel : ICC पंचांच्या एलिट पॅनलमध्ये नितीन मेनन, 11 सदस्यांपैकी मेनन एकमेव भारतीय

मेनन यांचा 2020 मध्ये कोरोनाच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता.

ICC Elite Panel : ICC पंचांच्या एलिट पॅनलमध्ये नितीन मेनन, 11 सदस्यांपैकी मेनन एकमेव भारतीय
Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:52 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) भारताच्या नितीन मेनन (Nitin Menon) यांना ICC एलिट पॅनलमध्ये (ICC Elite Panel) कायम ठेवलं आहे. मेनन हे या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत तटस्थ पंच म्हणून पदार्पण करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्यानं सांगितले की, आयसीसीनं एलिट पॅनलमधील मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे. एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांमध्ये इंदूरचे 38 वर्षीय मेनन हे एकमेव भारतीय आहेत. आयसीसीनं अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. गेली तीन-चार वर्षे ते मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस चे तटस्थ पंच म्हणून पदार्पण करेल. मेनन यांचा 2020 मध्ये कोरोनाच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. व्यंकटरघवन आणि एस. रवीनंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे ते तिसरे भारतीय ठरले आहे.

आयसीसीनं प्रवासी निर्बंधांमुळे स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिल्यानंतरच मेनन भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम करू शकले.

हे सुद्धा वाचा

11 सदस्यांमध्ये इंदूरचे 38 वर्षीय मेनन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, आयसीसीने एलिट पॅनेलमधील मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला आहे. एलिट पॅनेलच्या 11 सदस्यांमध्ये इंदूरचे 38 वर्षीय मेनन हे एकमेव भारतीय आहेत. आयसीसीने अलीकडेच मेनन यांचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवला आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलंय. गेली 3-4 वर्षे ते आमचे मुख्य पंच आहेत. या महिन्याच्या अखेरीस तो तटस्थ पंच म्हणून पदार्पण करेल, असंही अधिकारी म्हणाला.

तिसरा भारतीय पंच

मेनन यांचा 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या सुरुवातीला एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. एस वेंकटराघवन आणि एस रवी यांच्यानंतर एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारा तो तिसरा भारतीय पंच बनला. आयसीसीने प्रवासी निर्बंधांमुळे स्थानिक पंचांना घरच्या मालिकेतील सामन्यांमध्ये काम करण्याची परवानगी दिल्यानंतर मेनन मात्र भारतात केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच काम करू शकला.

नितीन मेनन यांचा विक्रम

  1. नितीन मेननला अनुभव कमी पण कामगिरी मोठी
  2. फार कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट पंच
  3. त्यांनी दिलेले निर्णय क्वचितच बदलतात
  4. त्‍यांनी 68 आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात अ‍ॅफिशिएशन केलं
  5. नितीन मेनन यांनी 11 कसोटी
  6. 30 एकदिवसीय खेळवले
  7. 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत
  8. अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये कार्यरत
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.