काय नशिब म्हणावं केएल राहुलचं! चेंडू असा घुसला की…, पाहा Video
केएल राहुलच्या क्रिकेटविश्वात गेल्या काही महिन्यांपासून उलथापालथी सुरु आहेत. संघात स्थान मिळाल्यानंतरही हवी तशी फलंदाजी होत नाही. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर केलं होतं. आता इंडिया ए साठी खेळत आहे. मात्र येथेही त्याचं नशिब फुटकंच निघालं आहे. न्यूझीलंडनंतर या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही फेल गेला आहे.
केएल राहुलच्या फलंदाजीला गेल्या काही महिन्यांपासून ग्रहण लागलेलं आहे. त्याला फलंदाजीत सूरच गवसत नसल्याचं दिसत आहे. टीम इंडियात कमबॅकसाठी केएल राहुल सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण नशिब साथ देत नाही असंच दिसतंय. वारंवार संधी मिळूनही स्वत:ला सिद्ध करण्यात कमी पडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे इंडिया ए संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. मात्र येथेही जैसे तेथ आहे. भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात एक कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात केएल राहुल विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याची विकेट पाहून या दशकातील सर्वात खराब विकेट अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या सामन्यातीनल पहिल्या डावात केएल राहुलने 4 धावा केल्या होत्या. टॉम बोलँडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर दुसऱ्या डावात 10 धावांवर असताना अशा पद्धतीने बाद झाला की त्यालाही काही कळलंच नाही.
केएल राहुल कोरि रोचिसिओलीच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्याने टाकलेला चेंडू वाइड जाईल असं वाटत होतं. त्यामुळे केएल राहुलने जास्त काही विचार न करता चेंडू सोडण्याचा विचार केला. पण हा विचारच त्याच्या अंगलट आला. नशिबाची त्याला काही साथ मिळाली नाही. चेंडू सोडताना बरोबर पॅडच्या वरच्या भागाला लागला आणि दोन्ही पायांच्या मधून स्टंपवर आदळला. अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर केएल राहुलला विश्वासच बसला नाही. निराश होत केएल राहुल तंबूत परतला.
“Don’t know what he was thinking!”
Oops… that’s an astonishing leave by KL Rahul 😱 #AUSAvINDA pic.twitter.com/e4uDPH1dzz
— cricket.com.au (@cricketcomau) November 8, 2024
केएल राहुलची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची या सामन्यातून पूर्वतयारी सुरु असल्याचं बोललं जात आहे. पण त्याचा फॉर्म पाहता प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. केएल राहुल ऑस्ट्रेलियात 5 कसोटी सामने खेळला आहे. आकडेवारी पाहता त्याला ऑस्ट्रेलिया दौरा काही लाभलेला नाही असंच दिसत आहे. केएल राहुलने पाच सामन्यात 20.77 च्या सरासरीने 187 धावा केल्या आहेत. 2015 मध्ये त्याने सिडनीत शतक ठोकलं होतं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद