IND vs AFG 3rd T20i Live Streaming | तिसरा टी 20 सामना कधी आणि कुठे?
India vs Afghanistan 3rd T20i Live Streaming | रोहित शर्माला पहिल्या दोन्ही सामन्यात भोपळा फोडता आला नाही. मात्र रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिले 2 सामने जिंकून अफगाणिस्तानला विजयाचा भोपळा फोडू दिला नाही.
मुंबई | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने ही मालिका जिंकलेली आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने हे 6 विकेट्सने जिंकलेत. आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकून टीम इंडियाकडे अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्याची संधी आहे. हा तिसरा सामना कधी आणि कुठे होणार,टीव्हीवर कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना हा बुधवारी 17 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना कुठे होणार?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसऱ्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना हा मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा डाऊनलोड करावा लागेल.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.