Rohit Sharma | कॅप्टन रोहितचं अफगाणिस्तान विरुद्ध विस्फोटक शतक, सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक
India vs Afghanistan 3rd T20i | टीम इंडिया अडचणीत असताना रोहितने सावकाश सुरुवात करत डाव सावरला. त्यानंतर रोहितने टॉप गिअर टाकून अर्धशतकानंतर झटपट शतकही पूर्ण केलं. रोहितने यासह सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
बंगळुरु | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात विस्फोटक खेळी करत शतक ठोकलं आहे. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं आहे. रोहित यासह या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितने अवघ्या 64 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. रोहितने या शतकादरम्यान 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. या दरम्यान रोहितचा स्ट्राईक रेट 160.94 इतका होता.
टीम इंडियाच्या डावाची घसरगुंडी झाली. टीम इंडियाने पहिल्या 4 विकेट्स 22 धावांवर गमावल्या. मात्र त्यानंतर रोहितने टीम इंडियाचा हळुहळु डाव सावरत गिअर बदलला. तर दुसऱ्या बाजूने रिंकू सिंह यानेही रोहितला चांगली साथ दिली. रोहितने 41 बॉलमध्ये या 50 धावा पूर्ण केल्या. 3 सिक्स आणि 4 फोर ठोकले. त्यानंतर रोहितने पुढील 23 चेंडूमध्ये 53 धावा केल्या. रोहितने यासह सूर्यकुमार यादव याला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड केला.
रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला. रोहितचं हे पाचवं टी 20 मधील शतक आहे. रोहित शतकानंतर आणखी आक्रमक झाला. रोहित अखेरपर्यंत नाबाद राहिला. रोहित 69 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 सिक्सच्या मदतीने नाबाद 121 धावा केल्या. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील ही सर्वात मोठी खेळी ठरली.
रोहितची विस्फोटक शतक
🎥 That Record-Breaking Moment! 🙌 🙌@ImRo45 notches up his 5⃣th T20I hundred 👏 👏
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ITnWyHisYD
— BCCI (@BCCI) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.