IND vs AUS 2nd T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात या 11 खेळाडूंची निवड ठरेल बेस्ट! जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात जोश इंग्लिस, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी चांगली कामगिरी केली होती. आता दुसऱ्या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील? ते जाणून घ्या.
मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा हातातोंडाशी आलेला सामना गमवण्याची वेळ येते. कधी कधी दिग्गज खेळाडू ऐन मोक्याची क्षणी नांगी टाकून देतात. तर दुबळे समजले जाणारे खेळाडू बाजी मारून जातात. त्यामुळे स्वप्नपूर्ती करण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंची हवी तितकी शाश्वती घेता येत नाही. पण मागच्या आकडेवारी चमकदार कामगिरी करू शकतात असा अंदाज बांधला जाऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 2 गडी राखून शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं आणि विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 27 टी20 सामने खेळले गेले आहेत. यात भारताचा वरचष्मा दिसून येत आहे. भारताने 16 सामन्यात, तर ऑस्ट्रेलियाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामना अनिर्णित ठरला आहे. तर भारतात खेळल्या गेलेल्या 11 सामन्यांपैकी फक्त 4 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला आहे.
पहिल्या सामन्यात जोश इंग्लिस, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या खेळाडूंना पहिली पसंती दिली जाईल. पण नेहमी हेच खेळाडू तशीच कामगिरी करतील असं नाही. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना अंदाज घ्या.
ड्रीम इलेव्हन 1: जोश इंग्लिस (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, रिंकू सिंग, तन्वीर संघा, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, जेसन बेहरेनडॉर्फ.
ड्रीम इलेव्हन 2: जोश इंग्लिस, तिलक वर्मा, इशान किशन, यशस्वी जयस्वाल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव, तन्वीर संघा, अर्शदीप सिंग (उपकर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, एरॉन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.