INDvsAUS, 2nd Test | दुसऱ्या दिवसाचा ‘खेळ खल्लास’, ऑस्ट्रेलियाकडे आघाडी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलिया 62 धावांनी आघाडीवर आहे.

INDvsAUS, 2nd Test | दुसऱ्या दिवसाचा 'खेळ खल्लास', ऑस्ट्रेलियाकडे आघाडी
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 7:54 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत कांगारुंनी 62 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा करत टीम इंडियाला पहिल्या डावात 262 धावांवर ऑलआऊट केलं.त्यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात 1 धावेची नाममात्र आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या दिवसाचा गेम संपला तोवर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 61 धावा केल्या. ट्रेव्हिस हेड 39 आणि मार्नस लाबुशेन 16 धावांवर नॉटआऊट आहेत. तर टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने एकमेव विकेट घेतली. दरम्यान या निमित्ताने टीम दुसऱ्या दिवसाच्या खेळात नक्की काय काय झालं, हे जाणून घेऊयात.

विराट कोहली वादग्रस्त निर्णय

विराट कोहली याला टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 50 व्या ओव्हरमध्ये आऊट देण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरला. मॅथ्यू कुहनेमन ही ओव्हर टाकत होता. विराट या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. विराट 44 धावांवर माघारी परतला. विराट याला वादग्रस्तरित्या आऊट दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंन आहे. तसेच आऊट झाल्यानंतर विराटचा ड्रेसिंग रुममध्ये संताप पाहायला मिळाला.

अश्विन-पटेल यांची निर्णायक भागीदारी

लायनच्या फिरकीसमोर टीम इंडियाने सपशेल नांग्या टाकल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी डाव सावरला. या जोडीने आठव्या विकेट्ससाठी 124 धावांची निर्णायक भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरलेली. मात्र कॅप्टन पॅट कमिन्सच टीमच्या मदतीला धावून आला. पॅट कमिन्स याने ही सेट जोडी फोडली.

हे सुद्धा वाचा

पॅटने अश्विनला आऊट केलं. पॅटने एकच विकेट घेतली पण ती विकेट फार निर्णायक ठरली. पॅटने अश्विनला 37 धावांवर बाद केलं. अश्विननंतर अक्षरही काही ओव्हरनंतर आऊट झाला. अक्षरने टीम इंडियाकडून सर्वाधिक 74 धावा केल्या.

नाथन लायन याचा ‘पंच’

नाथन लायन याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. लायनने टीम इंडियाच्या 5 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लायनने केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत आणि अक्षर पटेल या प्रमुख 5 जणांचा काटा काढला. लायनने 29 ओव्हरमध्ये 67 धावा देत ही कामगिरी केली.

सामन्याची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव – 263 रन्स 78 ओव्हर.

टीम इंडिया पहिला डाव – 262 रन्स 83 ओव्हर.

दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया – 61-1, 62 धावांची आघाडी.

टीम इंडिया – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.