IND vs AUS 3rd Test : लाबुशेन-अश्विनमध्ये मैदानात हे काय चाललेल? रोहित, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, VIDEO
IND vs AUS 3rd Test : कांगारुंना जशास तस उत्तर देण्यात अश्विन कधीही मागे नसतो, हे पुन्हा एकदा दिसून आलं. पहा VIDEO. शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियन टीम 76 धावांच लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरली होती.
IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियन टीमला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात टीम इंडियाचे खेळाडू अजिबात मागे नसतात. रविचंद्रन अश्विन तर, ऑस्ट्रेलियन प्लेयर्ससोबत माइंड गेम खेळण्यात तरबेज आहे. इंदोर कसोटीत तिसऱ्यादिवशी आज हे दिसून आलं. शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियन टीम 76 धावांच लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरली होती. मार्नस लाबुशेन क्रीजवर असताना, रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी अश्विन आणि लाबुशेनमध्ये मैदानात जे घडलं, ते खूपच गमतीशीर होतं. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अंपायर जो विलसन यांना मध्यस्थी करावी लागली.
आज तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियन टीम लक्ष्याचा पाठलाग करताना 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना झाला. ओव्हरमधील चार चेंडू टाकल्यानंतर अश्विनने दोन पावलात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नव्या रन-अपनुसार तो स्टम्पसच्या मागे उभा होता.
अश्विनकडे पाहून हसत होता
अश्विनने गोलंदाजी करण्यासाठी पहिलं पाऊल टाकताच लाबुशेन क्रीजमधून बाजूला गेला. तो तिथू थांबून अश्विनकडे पाहून हसत होता. लाबुशेनच्या या कृतीने अश्विन वैतागला. अंपायर विलसन लगेच यांनी लगेच हस्तक्षेप केला. रोहित सुद्धा लाबुशेनसोबत बोलण्यासाठी गेला. लाबुशेन दोघांना त्याची बाजू सांगत होता.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) March 3, 2023
सुरुवात चांगली झाली होती
आज ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांच सोपं लक्ष्य होतं. फिरकी गोलंदाजांवरील भरवशामुळे टीम इंडियाच्या विजयाची शक्यता वाटत होती. सुरुवातही तशीच झाली होती. दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर अश्विनने उस्मान ख्वाजाला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चेंडू ख्वाजाच्या बॅटच्या कडेला लागला. विकेटकीपर केएस भरतने कुठलीही चूक न करता झेल घेतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय
त्यानंतर लाबुशेन आणि ट्रेव्हिस हेड यांनी नाबाद भागीदारी करुन भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी विजयावर शिक्कामोर्तब केलं. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाकडे अहमदाबादमध्ये होणारा चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-2 बरोबरी साधण्याची संधी आहे.