Rohit sharma : IPL 2023 दरम्यान खेळाडूंना ब्रेक देण्याबद्दल रोहित शर्माच स्पष्ट मत

Rohit sharma : भारतात यावर्षी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. याआधी भारतात वनडे वर्ल्ड कप झाला, त्यावेळी टीम इंडियाने जेतेपद मिळवलं होतं. बीसीसीआयला यावेळी सुद्धा आपल्या टीमकडून हीच अपेक्षा आहे.

Rohit sharma : IPL 2023 दरम्यान खेळाडूंना ब्रेक देण्याबद्दल रोहित शर्माच स्पष्ट मत
Rohit sharma
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 9:58 AM

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज संपल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग सुरु होणार आहे. एकवर्ष एकत्र खेळणारे खेळाडू आता परस्पराविरोधात मैदानात रणनिती बनवून उतरतील. या वर्षाच्या अखेरीस वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आहे. टीम इंडियाच्या काही स्टार खेळाडूंना लीग दरम्यान ब्रेक मिळू शकतो अशा बातम्या येत आहेत. पण रोहित शर्माने या शक्यताचा इन्कार केलाय. आयपीएल दरम्यान ब्रेक मिळेल, असं वाटत नाही, असं रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे नंतर म्हणाला.

भारतात यावर्षी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. याआधी भारतात वनडे वर्ल्ड कप झाला, त्यावेळी टीम इंडियाने जेतेपद मिळवलं होतं. बीसीसीआयला यावेळी सुद्धा आपल्या टीमकडून हीच अपेक्षा आहे. बोर्डाला वर्ल्ड कपशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तयारीत कुठलीही कमतरता ठेवायची नाहीय. त्यासाठी त्यांनी फ्रेंचायजीला काही सल्ले दिले आहेत.

खेळाडूंच्या ब्रेकवर रोहित शर्माच स्पष्ट मत

खेळाडूंना ब्रेक मिळणार की, नाही? हे त्या टीम्सवर अवलंबून आहे असं रोहित शर्माने सांगितलं. “मला वाटत नाही की, कुठला खेळाडू IPL दरम्यान ब्रेक घेईल. आम्ही काही टीम्सना सल्ले दिले आहेत. पण ते ऐकायच की नाही? हे फ्रेंचायजींवर आहे. फ्रेंचायजीच निर्णय घेतील. कारण ते लीगमध्ये खेळाडूंचे मालक आहेत. त्याशिवाय खेळाडूंवर सुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत. खेळाडूंना वाटलं की, ते जास्त क्रिकेट खेळतायत, तर ते 1-2 सामन्यांचा ब्रेक घेऊ शकतात. पण मला त्याची शक्यता कमी वाटतेय” असं रोहित शर्मा म्हणाला.

बीसीसीआयने फ्रेंचायजींना काय सल्ला दिलाय?

आयपीएलमध्ये प्रत्येक टीमला लीग राऊंडमध्ये 14-14 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे थकावट येणं स्वाभाविक आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार आहे. आयपीएलचा थकवा घेऊन टीम इंडियाने WTC फायनलमध्ये उतरावं, अशी बीसीसीआयची अजिबात इच्छा नसेल. आयपीएलमध्ये खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका कायम आहे. बीसीसीआयने काही खेळाडूंबद्दल टीम्सना सल्ले दिले आहेत. पण अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.