Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 3rd Test : टीम इंडिया आज मॅच हरली, तर एका माणसाची नोकरी जाणार?

IND vs AUS 3rd Test : आता इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरु असलेला तिसरा कसोटी सामना सुद्धा त्याच दिशेने चाललाय. आज तिसरा दिवस असून आजच या कसोटीचा निकाल लागेल.

IND vs AUS 3rd Test : टीम इंडिया आज मॅच हरली, तर एका माणसाची नोकरी जाणार?
indian team
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:46 AM

IND vs AUS 3rd Test : फक्त खेळाडूच नाही, पीच सुद्धा बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये चर्चेचा विषय बनलाय. नागपूर आणि दिल्ली कसोटी तीन दिवसात संपली. आता इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरु असलेला तिसरा कसोटी सामना सुद्धा त्याच दिशेने चाललाय. आज तिसरा दिवस असून आजच या कसोटीचा निकाल लागेल. कदाचित एका सेशनमध्ये खेळ संपेल. बीसीसीआय इंदोरच्या खेळपट्टीवरुन नाराज झाल्याची माहिती आहे.

समंदर सिंह चौहान यांना मध्य प्रदेश क्रिकेट असोशिएशनकडून नारळ मिळू शकतो. दोन महिन्यांपूर्वी लखनौमध्ये सुद्धा क्युरेटरच्या बाबतीत असच झालं होतं. त्यावेळी न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात खेळपट्टी टी 20 ला साजेशी नव्हती. हार्दिक पंड्याने पीचबद्दल तेव्हा नाराजी व्यक्त केली होती.

ICC काय रेटिंग देणार?

इंदोरच्या पीचला ICC कडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. हेड कोच राहुल द्रविड, बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी इंदोरच्या खेळपट्टीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मायदेशात चेन्नईमध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर आता टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.

कारवाईची कुऱ्ंहाड कोसळणार?

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात रविंद्र जाडेजा गोलंदाजी करत होता. समोर उस्मान ख्वाजा होता. त्यावेळीच चेंडूला मोठा टर्न मिळायला सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसात 30 विकेट पडल्या असून महत्त्वाच म्हणजे भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियन मीडियाकडून सातत्याने खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. इंदोर टेस्टचा निकाल लागल्यानंतर पीच क्युरेटरला बीसीसीआयसमोर हजर रहाव लागेल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. या क्युरेटरवर कारवाईची कुऱ्ंहाड कोसळू शकते.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.