IND vs AUS Test : हुश्श अखेर जोडी फुटली, पण त्याआधी कॅमरुन ग्रीनचा शतकी प्रहार, टीम इंडिया बॅकफूटवर
IND vs AUS 4th Test : आज बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची 4 बाद 255 धावा अशी स्थिती होती.
IND vs AUS 4th Test : टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणणारी उस्मान ख्वाजा-कॅमरुन ग्रीनची जोडी अखेर फुटली आहे. दुसऱ्यादिवशी टीम इंडियाला अश्विनने पहिलं यश मिळवून दिलं. अश्विनने कॅमरुन ग्रीनला केएस भरतकरवी झेलबाद केलं. ग्रीनने बाद होण्याआधी शतकी प्रहार केला. त्याने 170 चेंडूत 114 धावा करताना 18 चौकार मारले. पाचव्या विकेटसाठी ग्रीन-ख्वाजा जोडीने 208 धावांची भागीदारी केली. आज बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची 4 बाद 255 धावा अशी स्थिती होती.
आज सकाळी खेळाला सुरुवात झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपासून रोखण्यासाठी टीम इंडियाला झटपट विकेट आवश्यक होते. पण टीम इंडियाला अपेक्षित यश मिळालं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष कायम राहिला. कॅमरुन ग्रीन बाद झाला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुस्थितीत होता. 378 धावांवर ग्रीनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट गेली.
अश्विनचा डबल स्ट्राइक
कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर अश्विनने त्याच ओव्हरमध्ये दुसरी विकेट काढली. ओव्हरच्या लास्ट बॉलवर त्याने एलेक्स कॅरीला अक्षर पटेलकरवी झेलबाद केलं. कॅरी शुन्यावर आऊट झाला. आजच्या दिवसात आतापर्यंत अश्विनने दोन विकेट काढलेत. अन्य बॉलर्सना यश मिळालेलं नाही. ऑस्ट्रेलियाची टीम आता 400 धावांच्या जवळपासून असून बातमी लिहिताना ऑस्ट्रेलियाची 384/6 अशी स्थिती आहे. टीम इंडियासाठी सीरीज जिंकण्यापुरतच या कसोटी सामन्याच महत्त्व नाहीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी टीम इंडियाला टेस्ट मॅच जिंकावीच लागेल.