IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्ट मॅच सुरु असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी

IND vs AUS 4th Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला काहीही करुन ही टेस्ट मॅज जिंकणं आवश्यक आहे. या दरम्यान टीम इंडियाच टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे.

IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्ट मॅच सुरु असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 11:13 AM

IND vs AUS 4th Test : अहमदाबाद येथे टेस्ट मॅच सुरु असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधला चौथा आणि मालिकेतील अखेरचा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला काहीही करुन ही टेस्ट मॅज जिंकणं आवश्यक आहे. ही टेस्ट मॅच सुरु असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आलीय. श्रेयस अय्यर संदर्भात ही बातमी आहे. श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापत झालीय. अय्यरच्या जुन्या दुखापतीने डोक वर काढलय.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीच स्कॅनिंग करण्यात आलय. श्रेयस अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्यादिवशी श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापतीचा त्रास सुरु झाला.

काय त्रास होतोय?

श्रेयस अय्यरच्या दुखापती संदर्भात माहिती बीसीसीआयने शेअर केलीय. अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याला लोअर बॅकचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आलं. BCCI ची मेडीकल टीम श्रेयस अय्यरच्या दुखापीतवर लक्ष ठेवून आहे.

बॅटिंगला येणार नाही?

श्रेयस अय्यर दुखापतीमुळेच अजून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला नाही. तो 4 व्या नंबरवर बॅटिंग करतो. त्याच्याजागी तिसऱ्यादिवशी रवींद्र जाडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. जाडेजा बाद झाल्यानंतर चौथ्या दिवशी केएस भरत बॅटिंगसाठी मैदानात आला. त्यावरुन श्रेयस अय्यरच्या दुखापतीची कल्पना येते.

अहमदाबादमध्ये आता पुढे तो खेळणार नाही?

टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायला तयार नाहीय. कारण या नंतर वनडे सीरीज आहे. श्रेयस अय्यरचा टीममधील रोल महत्त्वाचा असेल. इंजरीनंतर अय्यरच्या अहमदाबाद कसोटीत खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे. पहिल्यांदा दुखापत कधी झाली?

श्रेयस अय्यसाठी लोअर बॅक इंजरीचा त्रास नवीन नाहीय. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज दरम्यान त्याला पहिल्यांदा हा त्रास झाला होता. त्यानंतर एक महिना तो NCA मध्ये रिहॅबसाठी होता. त्यामुळेच श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर कसोटीत खेळू शकला नाही. त्याच्याजागी सूर्यकुमार यादवला टेस्ट डेब्युची संधी मिळाली. आता चौथ्या कसोटी दरम्यान श्रेयस अय्यरला पुन्हा त्रास सुरु झालाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.