Team India | टीम इंडिया पहिल्यांदाच या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

Indian Cricket Team | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता सर्वच संघ हे टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या तयारीला लागले आहेत. टीम इंडिया विरुद्ध जानेवारी महिन्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. हा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.

Team India | टीम इंडिया पहिल्यांदाच या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार,  वेळापत्रक जाहीर
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 8:50 PM

मुंबई | टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका आहे. या टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानंतर आणि टीम इंडियानेही संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टी 20 सीरिजला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या टी 20 मालिकेची लगबग सुरु असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया नववर्षात टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध जानेवारी 2024 मध्ये 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक समोर आलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. या टी 20 मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.

मालिकेतील तिन्ही सामने हे अनुक्रमे मोहाली, इंदूर आणि बंगळुरु येथे होणार आहे. पहिला सामना 11 जानेवारी तर अंतिम सामना 17 जानेवारीला होणार आहे. या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. आतापर्यंत टीम इंडिया आणि अफगाणिस्तान वर्ल्ड कप आणि आशिया कपमध्ये आमनेसामने आले आहेत. तर उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. मात्र ही पहिलीच द्विपक्षीय टी 20 मालिका आहे.

टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात झालेले सामने

दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 4 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना हा बरोबरीत राहिला आहे. तर 5 टी 20 सामन्यांपैकी 4 सामन्यात टीम इंडियाचा विजय झालाय. तर 1 मॅचचा निकाल लागला नाही. याचाच अर्थ असा की अफगाणिस्तानला टीम इंडिया विरुद्ध अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नाही. मात्र अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार कामगिरी केलीय. त्यामुळे आगामी टी 20 मालिकेत टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

अफगाणिस्तानचा भारत दौरा

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.

दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.

तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.