INDvsAUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमधून घातक खेळाडू ‘आऊट’
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून वाईट बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू सीरिजमधून तडकाफडकी बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु आहे. या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने पहिले 2 सामन शानदार पद्धतीने जिंकले आहेत. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूर येथे होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू अचानक सीरिजमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्पिनर एश्टन एगर याला टीममधून रिलीज करण्यात आलं आहे. एश्टन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे टोनी डोडमेड यांनी दिली आहे.
एश्टन देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासाठी त्याला रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे आता एश्टन तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.
ऑस्ट्रेलिया या मालिकेत आधीच पिछाडीवर आहे. त्यात एश्टनला रिलीज करण्यात आलंय. त्याआधी ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे आणि वैयक्तिक कारणामुळे बाहेर झाले आहेत. यामुळे आता ऑस्ट्रेलिया ही कसोटी मालिका गांभिर्याने घेत नाहीये का, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान या कसोटी मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे.
उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर
चौथी कसोटी, 9-13 मार्च,
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.